मुंबई - महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल ७०० कोटी रुपयांची ( BMC revenue increase by 700 crore ) वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ५ हजार ७९२ कोटी २२ लाख ५० हजार रुपये इतके कर संकलन नोंदविण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या इतिहासातील आजपर्यंतचे हे विक्रमी करसंकलन ( BMC record break tax collection ) ठरले आहे.
१ जानेवारी २०२२ पासून बृहन्मुंबईत ५०० चौरस फूटापर्यंतच्या निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट ( property tax by BMC ) देण्यात आली आहे. तरीही कर संकलनात झालेली घसघशीत वाढ झाली ( property tax collection by BMC ) आहे. हे पाहता करनिर्धारण व संकलन खात्याची कामगिरी लक्षवेधी ठरली ( BMC tax collection performance ) असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
इतिहासातील सर्वाधिक कर वसुली - ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुली ही रुपये ४ हजार १६१ कोटी इतकी झाली होती. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुली ही रुपये ५ हजार ०९१ कोटी इतकी झाली होती. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराची वसुली ही रुपये ५,७९२.२२ कोटी इतकी झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा कर संकलन ७०० कोटी ९३ लाख ६३ हजार रुपयांनी म्हणजेच १३.७७ टक्क्यांनी वाढली आहे. यंदाची कर वसुली महानगरपालिकेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक कर वसुली ठरली आहे.
१ जानेवारी २०२२ पासून सवलत - मागील २ वर्षांपासून कोविड विषाणू संसर्ग परिस्थितीमुळे जनजीवनाला आणि अर्थव्यवस्थेला निरनिराळ्या आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र, या आव्हानावर यशस्वीपणे मात करुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वाढत्या संख्येने मालमत्ता कर संकलन करुन आपले नाणे खणखणीत सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील ५०० चौरस फूट (४६.४५ चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती व निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्देशानुसार दिनांक १ जानेवारी २०२२ पासून ही सवलत लागू करण्यात आली आहे. एकूण १६ लाख १४ हजार निवासी सदनिकाधारकांना त्याचा लाभ झाला आहे. सवलतीचा हा निर्णय पूर्णपणे योग्य ठरविला. कर संकलनावर कोणताही विपरित परिणाम न होऊ देता महानगरपालिका प्रशासनाने आपली कार्यक्षमता दाखवून दिली असल्याचे कर निर्धारण व संकलन विभागाचे सह आयुक्त सुनील धामणे, सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले.
शहर विभागामध्ये सर्वाधिक कर वसुली -१ एप्रिल, २०२१ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीतील मालमत्ता कर वसुलीत सर्वाधिक वाढ ही शहर विभागामध्ये म्हणजे १७.५१ टक्के इतकी झाली आहे. गतवर्षी शहर विभागात १,४९६.१० कोटी रुपये कर प्राप्त झाला होता. तर यंदा १,७५८.२० कोटी रुपये करसंकलन झाले आहे. म्हणजेच २६२.०३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. पूर्व उपनगरांमध्ये गतवर्षी १,०७०.७१ कोटी रुपये इतकी मालमत्ता कर वसुली झाली होती. तर यंदा १,१८८.१६ कोटी रुपये कर जमा झाला आहे. एकूण ११७.४४ कोटी रुपयांची अर्थात १०.९७ टक्के इतकी वाढ झाली आहे. पश्चिम उपनगरांमध्ये गतवर्षी २,५२२.३८ कोटी रुपये कर मिळाला होता. तर यंदा २,८४०.०४ कोटी रुपये कर महानगरपालिकेकडे जमा झाला आहे. ही वाढ ३१७.६५ कोटी रुपयांची अर्थात १२.५९ टक्के इतकी आहे.
जी, दक्षिण विभागात सर्वाधिक कर वसुली - महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांचा विचार करता, एकूण २१ विभागांनी गतवर्षाच्या तुलनेत यंदा अधिक कर संकलन केले आहे. त्यापैकी, जी/दक्षिण विभागाने सर्वाधिक ३४.३४ टक्के, त्याखालोखाली एफ/उत्तर विभागाने ३२.९२ टक्के तर पी/दक्षिण विभागाने ३३.७१ टक्के इतकी वाढ गतवर्षाच्या तुलनेत केली आहे. त्यापाठोपाठ एच/पश्चिम २७.९३ टक्के, एच/पूर्व विभागात २४.३० टक्के आणि एफ/दक्षिण विभागात २३.७० टक्के अधिक कर संकलन झाले आहे. एवढेच नव्हे तर शासकीय मालमत्ता कर वसुलीतदेखील यंदा १८८.६२ टक्के वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात २.०१ कोटी रुपये शासकीय मालमत्ता कर संकलन झाले होते. तर यंदा ५.८१ कोटी रुपये म्हणजे ३.८० कोटी रुपये इतके अधिक कर संकलन झाले आहे.
हेही वाचा-Chief Minister's Explanation : माझा माझ्या सहकार्यांवर पूर्ण विश्वास - मुख्यमंत्री
हेही वाचा-Threats To PM Modi : पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी