मुंबई - आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी शिवाजी पार्क येथे मोठा सोहळा होत आहे. या शपथविधी कार्यक्रमासाठी देशभरातून अनेक हिंदू-मुस्लीम बांधव या ठिकाणी आलेले आहेत. हे त्रिशंकू सरकार जनतेच्या हितासाठी उत्तम निर्णय घेतील. सर्व हिंदू मुस्लीम बांधवांच्या अपेक्षा पूर्ण करतील असा विश्वास या शपथविधी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या हिंदू मुस्लीम बांधवांनी व्यक्त केला. याचा आनंद हिंदू-मुस्लीम बांधव साजरा करत आहेत.
या शपथविधी कार्यक्रमासाठी मुस्लीम शिवसैनिक बांधव शकील कुरेशी हे मुस्लीम बांधवांचे पारंपरिक कुर्ता आणि टोपी घालून याठिकाणी आलेले आहेत. त्यातच ग्रामीण भागातून बबन शिंदे हे शेतकऱ्याच्या रूपात या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी एकमेकांना बघताच घट्ट मिठी मारली व आनंदोत्सव साजरा केला. यांच्याशी ईटीव्ही भारत संवाद साधला असता, राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत जे सरकार बनत आहे ते आम्हाला चांगला न्याय देईल व आमचे प्रश्न सोडवेल असा विश्वास त्यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.
मुस्लिम बांधवांनी या शपथविधी कार्यक्रमाला येत असताना सांगितले की मुस्लिम आरक्षण जे प्रलंबित आहे, ते हे सरकार मुस्लिम बांधवांना देईल अशी आम्हाला खात्री आहे. ग्रामीण भागातून आलेल्या डावरी गोसावी समाजाला आपले सर्व हक्क मिळाले पाहिजे असे एका शेतकऱ्यांनी सांगितले. डवरी गोसावी समाजातील एक हत्याकांड झालेला आहे जे मोठ्याप्रमाणात गाजत आहे, त्याला न्याय मिळाले पाहिजे असे बबन शिंदे या शेतकऱ्यांनी सांगितले. एकंदरीतच हिंदू-मुस्लीम बांधवांच्या अपेक्षा या महा विकास आघाडीकडून पूर्ण होतील, आजच्या भावना शिवसैनिक तसेच आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.