ETV Bharat / city

Youth Arrested for Theft Bike : टाळेबंदीमुळे गेली नोकरी, नव्या नोकरीसाठी उच्च शिक्षित तरुणाने केली दुचाकी चोरी - आरे

टाळेबंदीमुळे नोकरी गेली. नव्या नोकरीसाठी दुचाकीची गरज असल्याने एका उच्च शिक्षित तरुणाने दुचाकी चोरली व नवी नोकरी करू लागला. आरे पोलिसांनी त्या उच्च शिक्षित तरुणाने अटक केली ( Youth Arrested for Theft Bike ) असून त्याला 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Mar 1, 2022, 3:49 PM IST

मुंबई - टाळेबंदीमुळे कंपनीतील नोकरी गेली. त्यामुळे बेरोजगार झालेल्या तरुणाना दूध वितरण करण्याच्या नोकरीसाठी दुचाकीची गरज होती. मात्र, टाळेबंदीत नोकरी गेल्याने दुचाकी घेण्याइतपत पैसे नसल्याने त्याने दुचाकी चोरली व पोलिसांच्या तावडीत सापडला. सुर्यकांत वडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दुचाकी चोर सुरज गोरुले (वय 28 वर्षे ), यास पोलिसांनी अटक केली ( Youth Arrested for Theft Bike ) आहे. न्यायालयाने 2 मार्चपर्यंत सुरज पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी घेतला आरोपीचा शोध - याबाबत आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर डोंबे ( Mumbai Police ) यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सुर्यकांत वडे यांनी त्यांचे भाऊ मारुती वडे याला कामाला येण्या-जाण्यासाठी आपली दुचाकी दिली होती. मारुती हा कामाच्या ठिकाणी रात्री ती दुचाकी लावली. सकाळी काम संपल्यानंतर दुचाकी न दिल्याने त्यांनी शोधाशोध केली. मात्र, त्यांना दुचाकी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहायाने दुचाकीचा शोध घेतल्यास ती दुचाकी सुरज गोरुले हा नंबर प्लेट काढून वापरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शास आले. त्यानंतर पोलिसांनी सुरज यास ताब्यात घेतले.

नव्या नोकरीसाठी केली चोरी - पोलिसांनी सुरज यास ताब्यात घेऊन विचारपूस केली. सुरज हा उच्च शिक्षित असून तो एका कंपनीत कामाला होता. टाळेबंदीमुळे त्याची नोकरी गेली. आर्थिक अडचण भासत असल्याने त्याने नोकरी शोधण्यास सुरुवात केली. दूध वितरण करण्याची त्याला नोकरी मिळाली. मात्र, त्यासाठी एक मोपेड लागणार होती. सुरजकडे मोपेड नव्हती, त्यामुळे त्याने दुचाकी चोरी केली त्यानंतर नंबरप्लेट काढून तो दूध वितरण करण्याचे काम करू लागला, असा कबूली जबाब सुरजने पोलिसांना दिला. पोलिसांनी सुरजला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - Denied Bail Of Police Officer : खंडणी प्रकरणातील तिनही पोलिस अधिकार्‍यांचा जामीन फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.