ETV Bharat / city

Exam will Conducted Online : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परीक्षा ऑनलाइनच - मंत्री उदय सामंत - MLA Vaibhav Naik

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला असताना तंत्र व शिक्षण विभागाच्या 15 फेब्रुवारीपर्यंतच्या परिक्षा या ऑनलाइनच ( Exam will Conducted Online ) घेणार असल्याची भूमिका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांनी स्पष्ट केली. त्यापुढील निर्णय राज्य शासन टास्क फोर्स ( Task Force ) चर्चा करून घेतला जाईल, असे ही सामंत म्हणाले.

मंत्री उदय सामंत
मंत्री उदय सामंत
author img

By

Published : Feb 2, 2022, 5:36 PM IST

Updated : Feb 2, 2022, 5:48 PM IST

मुंबई - दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला असताना तंत्र व शिक्षण विभागाच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइनच ( Exam will Conducted Online ) घेणार असल्याची भूमिका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांनी स्पष्ट केली. त्यापुढील निर्णय राज्य शासन टास्क फोर्स ( Task Force ) चर्चा करून घेतला जाईल, असे ही सामंत म्हणाले.

बोलताना मंत्री उदय सामंत

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शाळा, महाविद्यालये बंद करून ऑनलाइन शिक्षण सुरू केले. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad ) ऑफलाइन परीक्षा घेण्याची भूमिका मांडली होती. ऑनलाइन शाळा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे परीक्षा ऑफलाइन न घेता ऑनलाइन घ्यावी, मागणी सुरू होती. विकास पाठक उर्फ हिंदुस्थान भाऊ याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात, अशी मागणी करणारा चिथावणीखोर व्हिडिओ व्हायरल केला. शालेय विद्यार्थी या व्हिडिओ बळी पडले आणि त्यांनी राज्यभरात उग्र आंदोलन केले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शालेय विद्यार्थ्यांनी असे आंदोलन ( Students Agitation ) करण्याऐवजी परीक्षेसंबंधी काही सूचना होत्या, त्या शिक्षण विभागाला द्यायला हव्या होत्या. सध्या कोरोना काळ सुरू आहे. त्यानुसार मुलांची सुरक्षा आणि आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे, असे त्या म्हणाल्या. मात्र, परीक्षा ऑफलाइन होणार की ऑनलाइन, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

परीक्षा ऑनलाईनच - उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या परिक्षांबाबत कोणताही संभ्रम नाही, असे स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिले. ते म्हणाले की, राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा 15 फेब्रुवारी, 2022 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतील. मात्र, 15 फेब्रुवारीनंतर राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन, टास्क फोर्सची चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सामंत म्हणाले.

पडताळणी करून कारवाई - आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) अडचणीत असताना निलेश राणे यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला. शिवसेनेचे स्थानिक आमदार वैभव नाईक ( MLA Vaibhav Naik ) यांनी याबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत, कार्यवाही केली आहे. संबंधित यंत्रणा गुन्ह्यांची पडताळणी करून कारवाई करेल, असेही सामंत म्हणाले.

हेही वाचा - ED Mumbai : संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक

Last Updated : Feb 2, 2022, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.