मुंबई- खासदार भावना गवळीशी (Bhavana Gawali) संबंध असलेल्या एका फर्मच्या चौकशीत सईद खान याला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. गवळी या यवतमाळ वाशीम मतदारसंघाचे खासदार आहेत मनी लाँड्रिंग (Money laundry case) प्रकरणात ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. त्या सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचा भाग आहेत. गवळींच्या आई शालिनीताईंसोबत सईद खान महिला उत्कर्ष प्रतिष्ठान (Mahila Utkarsh Pratishthan ) नावाच्या फर्मचे संचालक होते. फर्मची स्थापना 2019 मध्ये करण्यात आली होती परंतु त्यापूर्वी, हा एक ट्रस्ट होता ज्यामध्ये गवळी आणि त्यांची आई सदस्य होत्या. ट्रस्ट कंपनीत बदलण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात खोटे आरोप करण्यात आले होते की नाही याचा तपास ईडी करत होती. कारण कंपनीचा वापर फसवणूक आणि निधी पळवण्याकरता झाल्याचा संशय होता. ट्रस्टमध्ये सुमारे 17 कोटी रुपयांची अनियमितता आढळून आल्याचा आरोप करण्यात आला होता.
खान यांनी जामीन मागितला आणि अधिवक्ता सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आणि युक्तिवाद पूर्ण झाला आणि 11 एप्रिल रोजी निकाल राखून ठेवण्यात आला होता. जामीन मंजूर करणार्या आदेशात खान यांना त्यांचा पासपोर्ट ट्रायल कोर्टात जमा करण्यास आणि कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय भारत सोडू नये असे म्हटले आहे. या आदेशात त्याला पुराव्याशी छेडछाड करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे आणि तपास अधिकाऱ्याला त्याचा सध्याचा पत्ता आणि मोबाइल नंबरची माहिती देण्यास सांगितले आहे. सईद खानला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाला हजेरी देण्याचे निर्देश दिले आहे.
काय आहे प्रकरण? : खासदार भावना गवळी यांच्याविरुद्ध हरीश सारडा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आहे. १९९२ मध्ये भावना गवळी (Bhavana Gawali) यांचे वडील पुंडलिकराव गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड (Balaji Particle Board) कारखान्याची स्थापना करून राज्य सरकारच्या हमीपत्रावर राष्ट्रीय सहकार निगमकडून ४३ कोटीचे कर्ज मिळविले. २००२ मध्ये गवळी यांनी या कारखान्याची १४ हेक्टर जमीन बेकायदा पद्धतीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला विकली. त्यातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
हेही वाचा-https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/city/mumbai/uddhav-thackeray-given-instructions-to-mlas-and-leaders-over-mid-term-election-in-meeting-district-president/mh20220704230737223223710