मुंबई - टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही व कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई केली होती. या कारवाईला आव्हान देणारी याचिका एआरजी मीडिया कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिकेवर आज सलग सुनावणी झाली आहे. अर्णब गोस्वामींबाबत तपास यंत्रणांची भूमिका काय? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे.
हेही वाचा - ६७वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : 'छिछोरे' सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट; तर मराठीमध्ये 'बार्डो'ची बाजी
अर्णबबाबत नेमकी काय भूमिका घेणार?
अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता चांगले मित्र आहेत. त्यांच्यातले संभाषण निव्वळ दोन मित्रांमधली चर्चा होती, असा युक्तिवाद अर्णब गोस्वामींच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. तर अर्णबबाबत नेमकी काय भूमिका घेणार? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना विचारला आहे. तसेच या प्रकरणात मुंबई पोलिसांना लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे तपास यंत्रणांवर ताशेरे
मागील सलग दोन दिवस झालेल्या सुनावणी दरम्यान रिपब्लिक टीव्हीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता. त्यानंतर काही महत्वाची निरक्षणं आणि प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केले. गेल्या तीन महिन्यांत जर अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात तुमच्याकडे कोणताही ठोस पुरावा उपलब्ध झालेला नाही तर मग त्यांना दिलासा का देऊ नये? तसेच आणखी किती काळ त्यांना तुम्ही केवळ संशयित आरोपी म्हणून गणणार आहात? याचिकाकर्त्यांचे नाव एफआयआर आणि आरोपपत्रातही नसताना त्यांच्याविरोधात कधीपर्यंत तपास करणार आहात? असे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेवर ओढले आहेत. पुढील सुनावणी २४ मार्चला होणार आहे.
हेही वाचा - VIDEO : परमबीर सिंग प्रकरणावरुन लोकसभेमध्ये गदारोळ; पाहा व्हिडिओ...