ETV Bharat / city

पहिल्याच पावसात मुंबईची दैना.. पेंटाग्राफ व ओव्हरहेड वायर तुटल्याने तिन्ही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत - overhead wire

मुंबईत पडलेल्या पहिल्याच पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाइन समजली जाणारी लोकलसेवा ठप्प झाली आहे.

हार्बर आणि मध्य रेल्वे विस्कळीत
author img

By

Published : Jun 10, 2019, 11:01 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये पावसाचे जोरदार आगमन झाले असून या पावसामुळे मुंबईची लाईफलाइन समजली जाणारी लोकलसेवा ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेच्या कोपर स्टेशनवर पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कोपर स्टेशनवर पेंटाग्राफ दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र पावसामुळे काम करण्यात अडचण येत आहे. या संकटामुळे प्रत्येक स्टेशनवर पोहोचण्यासाठी सुमारे ३० ते ४० मिनिटांचा अवधी लागतो आहे. मुंबई शहरासह उपनगराच्या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत मालाड स्थानकाबाहेर पाणी साचले आहेत. तर, ठाण्यात कल्याण, डोंबिवली व वसई विरार भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

तर दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्गावर माहीम ते वांद्रे स्थानका दरम्यान रात्री 9.40 वाजताच्या सुमारास माहीम ते वांद्रे स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे लोकल 15 ते 20 मिनिटे थांबली होती. त्यानंतर ओव्हरहेड वायर दुरुस्ती करून लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली.

दरम्यान मंगळवारी ११ जून रोजी मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. वेधशाळांच्या निरीक्षणानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होत असून त्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबई व किनारी भागामध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:Body:MH_MUM_Rains_Mumbai_7204684

मुंबईत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस

उकाडयाने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाच्या मुसळधार सरींनी दिलासा

मुंबई:उकाडयाने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाच्या मुसळधार सरींनी दिलासा दिला. मुंबईत सोमवारी साडेनऊपासून ढगांच्या गडगडासह पावसाच्या जोरदार सरी कोसळला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. संध्याकाळच्या सुमारास आकाशात काळया ढगांची दाटी झाल्यानंतर मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली.

अचानक पाऊस कोसळल्याने कामावरुन घरी निघालेल्या नोकरदारांचे हाल झाले. छत्री किंवा विनचिंटर सोबत नसल्यानं अनेकांना भिजतच घर गाठावे लागले. मुंबईत मागच्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात उकाडा बराच वाढला होता.

दरम्यान मंगळवारी ११ जून रोजी मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. वेधशाळांच्या निरीक्षणानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होत असून त्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबई व किनारी भागामध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार झाले की त्याच्या परिणामी किमाऱ्यालगतच्या प्रदेशांमध्ये पाऊस सुरू होतो. कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता जास्त असेल तर वादळी वाऱ्यांसह पाऊस येतो, जी स्थिती सध्या दिसत आहे. हवामान विभागानं अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याचे व त्यांची तीव्रता वाढत असल्याचे म्हटले आहे. परिणामी ११ व १२ जून रोजी मुंबईत पाऊस कोसळण्याचा व कदाचित वादळी वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागानं
व्यक्त केला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.