ETV Bharat / city

Rain In Mumbai: मुळधार पावसाचा फटका, साचलेल्या पाण्यातून मुंबईकरांनी घर गाठले

बुधवारी मुंबईत पावसाला सुरूवात (Rain In Mumbai) झाली आणि त्याचा फटका मुंबईच्या लोकल ( rain affect on mumbai local ) सेवेला बसला. मुंबईच्या अनेक भागात पाणी तुंबले. साचलेल्या पाण्यातून मुंबईकर नागरिकांना आपले घर गाठावे लागले.

मुळधार पाऊस
Heavy rains
author img

By

Published : Jul 1, 2022, 12:18 PM IST

मुंबई - मुंबईत बुधवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने याचा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला. तर मुंबईत काही सखल भागात पाणी साचले ( low-lying areas flooded ) . दरम्यान पुढील ५ दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल ( heavy rain in Konkan coast ) असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईतही मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा देण्यात आला आहे.

Heavy rain

पाणी साचले - मुंबईत ११ जूनला पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. बुधवारी रात्रीपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. गुरुवारी जोरदार पाऊस बरसला. यामुळे सायंकाळपर्यंत मिलन सबवे वगळता कुठेही पाणी साचले नव्हते. मात्र रात्री ८ नंतर जोरदार पाऊस पडल्याने दादर हिंदमाता,काळाचौकी, दादर, शीव स्थानक, शीव-माटुंगादरम्यान, हिंदमाता, माहीम, भक्ती पार्क, दादर-परळ दरम्यान, कुर्ला-शीव दरम्यान, एस व्ही रोड (अंधेरी पश्चिम), कुर्ला एल वॉर्ड परिसर आदी सखल विभागात पाणी साचले. साचलेल्या पाण्यातून मुंबईकर नागरिकांना आपले घर गाठावे लागले.

हेही वाचा -मणिपूरमध्ये भूस्खलन; किमान 16 जणांचा मृत्यू, 70 हून अधिक बेपत्ता

पावसाची जोरदार हजेरी - मुंबईत ११ जूनला पावसाने हजेरी लावली. मात्र पावसाच्या सरी पडल्यावर पावसाने पाठ फिरवली होती. काल रात्रीपासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली (Heavy rains hit Mumbai ) आहे. आज गरुवारी सकाळी ८ ते आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात मुंबई शहरात १७९.१३, पूर्व उपनगरात १०९.०६ तर पश्चिम उपनगरात १४०.५८ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मिलन सबवे परिसरात पाणी तुंबले होते. अर्ध्या तासात पाण्याचा निचरा झाल्यानंतर मिलन सबवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला अशी माहिती पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान आज शुक्रवारी १ जुलै रोजी दुपारी १.४६ वाजता समुद्राला मोठी भरती आहे. या दरम्यान ४.२५ मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. यावेळी नागरिक आणि पर्यटकांनी समुद्रात किंवा समुद्र किनारी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल सेवा ठप्प - मुंबईत बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारीही जोरदार बरसला. याचा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला. काल गुरुवारी रात्री ८.४५ च्या सुमारास दादर येथे पॉइंट फेलीयरमुळे लोकल सेवा ठप्प झाली. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून ठाणे कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या. याचा फटका कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना बसला. रात्री १०.१० वाजता सुमारे दीड तासाने लोकल सेवा सुरू झाली. मात्र लोकल सेवा धिमा गतीने सुरू असल्याने प्रवशांचे हाल झाले.

५ दिवस मुसळधार - गुजरात व कर्नाटक किनारपट्टीत पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील ५ दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज असल्याचे पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस बरसणार कुलाबा हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.

पालिकेकडे पावसाची नोंद - मुंबई शहरात १७९.१३ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. तर पूर्व उपनगरात १०९.०६ मिलिमिटर पाऊस झाल्याच नोंदवण्यात आले. पश्चिम उपनगरात १४०.५८ मिलिमिटर पावसाची नोंद झाली.

हेही वाचा -Heavy rain in Mumbai : मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते तुंबले, जनजीवन विस्कळीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.