मुंबई : राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. काल रात्रीपासूनच मुंबई उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या ८ दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईसह कोकणात ९ जून ते १२ जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. मुंबईतील पाऊस शुक्रवार पासून काहीसा कमी झाला आहे. मात्र मुंबईत १७ जूनपर्यंत पावसाचा यल्लो अर्लट देण्यात आला असून, पुढचे तीन दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
बूधवारी झाली होती ४ तास वाहतूक ठप्प
हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. चेंबूर सांताक्रूझ लिंक रोड वर काल पाणी साचल्याने 4 तास रस्ते वाहतूक ठप्प होती.
जोरदार पाऊस असूनही रस्ते वाहतूक आणि लोकल सुरळीत
मुंबईत आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून सायन सर्कल, हिंदमाता, दादर, माटुंगा या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई जोरदार पाऊस सुरू असला तरी, सध्या रस्ते वाहतूक आणि लोकल सुरळीतपणे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागातर्फे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा - मुंबईत कुठेही पाणी न साचल्याने रस्ते, रेल्वे वाहतूक सुरळीत