मुंबई - मुंबईत काल बुधवार रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आज गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने याचा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला आहे. तर मुंबईत काही ठिकाणी पाणी साचले आहे. दरम्यान पुढील ५ दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ( Heavy Rain In Mumbai ). त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जाऊ ठिकाणी. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे.
लोकल सेवा ठप्प - मुंबईत बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारीही जोरदार बरसला. याचा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला. रात्री ८.४५ क्या सुमारास दादर येथे पॉइंट फेलीयर मुळे लोकल सेवा ठप्प झाली. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडून ठाणे कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या. याचा फटका कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना बसला. रात्री १०.१० वाजता सुमारे दीड तासाने लोकल सेवा सुरू झाली. मात्र लोकल सेवा धिमा गतीने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल झाले.
सखल भागात पाणी साचले - मुंबईत गेले २४ तास पाऊस पडत आहे. यामुळे सायंकाळ पर्यंत मिलन सबवे वगळता कुठेही पाणी साचले नव्हते. मात्र रात्री ८ नंतर जोरदार पाऊस पडल्याने दादर हिंदमाता,काळाचौकी, दादर, शीव स्थानक, शीव-माटुंगादरम्यान, हिंदमाता, माहीम, भक्ती पार्क, दादर-परळ दरम्यान, कुर्ला-शीव दरम्यान, एस व्ही रोड (अंधेरी पश्चिम), कुर्ला एल वॉर्ड परिसर आदी सखल विभागात पाणी साचले. साचलेल्या पाण्यातून मुंबईकर नागरिकांना आपले घर गाठावे लागले.
पावसाची जोरदार हजेरी - मुंबईत ११ जूनला पावसाने हजेरी लावली. मात्र पावसाच्या सरी पडल्यावर पावसाने पाठ फिरवली होती. काल रात्रीपासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज गरुवारी सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासात मुंबई शहरात ११९.०९, पूर्व उपनगरात ५८.४० तर पश्चिम उपनगरात ७८.६९ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मिलन सबवे परिसरात पाणी तुंबले होते. अर्ध्या तासात पाण्याचा निचरा झाल्यानंतर मिलन सबवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला अशी माहिती पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
५ दिवस मुसळधार - गुजरात व कर्नाटक किनारपट्टीत पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील ५ दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी वर्तविला आहे. दिवसभरात कुलाबा - १२५ .६ मिलिमिटर, सांताक्रूझ - ५२.४ मिलिमिटर पाऊस झाला आहे. मुंबई शहरात ११९.०९ मिलिमिटर, पूर्व उपनगरात ५८.४० मिलिमिटर, पश्चिम उपनगरात ७८.६९ मिलिमिटर पाऊस झाला आहे.