मुंबई - संपूर्ण मार्च महिना उन्हाच्या चटक्यांनी तापलेला गेला. मात्र, आता एप्रिल महिन्यात देखील उष्णतेच्या लाटेचे संकेत मुंबई हवामान विभागाकडून देण्यात आले आहे. त्यात एक ते तीन तारखेदरम्यान 40 अंशाहून तापमान अधिक असण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली ( Heatwave In Maharashtra ) आहे.
याबाबत मुंबई हवामान विभागाचे अधिकारी डॉक्टर जयंत सरकार म्हणाले की, "आजच्या दिवशी आम्ही नाशिक, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर, पुढील चार दिवस म्हणजे 2 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत तापमान सरासरी पेक्षा कमी राहणार आहे."
दक्षिण कोकणात पावसाचा इशारा - "राज्यात पुढचे काही दिवस उष्णतेची लाट नसली तरी, चार आणि पाच तारखेदरम्यान दक्षिण कोकणात अर्थात गोव्यापर्यंत पावसाचा अंदाज आहे. तर, पाच तारखेला दक्षिण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाचे स्वरूप मध्यम स्वरूपाचे असेल," अशी माहिती जयंत सरकार यांनी दिली आहे.
हेही वाचा - Fadnavis ON Uke : सतीश उकेंवर महाराष्ट्र पोलिसांच्या तक्रारीवरूनच ईडीची कारवाई:- देवेंद्र फडणवीस