ETV Bharat / city

Disha Salian Case : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या दिशा सॅलियन प्रकरण याचिकेवर सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे ( Mla Nitesh Rane) यांच्यावर दिशा सॅलियन (Disha Salian) प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. मालवणी पोलीस ठाण्यात (Malvani Police Station) नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, याकरिता राणे पिता पुत्रांकडून याचिका दाखल करण्यात आली होती. दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांच्या विनंतीवरून, उच्च न्यायालयाने (High Court) सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली आहे. या याचिकेवर 29 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहेत.

Disha Salian Case
दिशा सॅलियन केस प्रकरण
author img

By

Published : Jul 26, 2022, 7:40 PM IST

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे ( Mla Nitesh Rane) यांच्यावर दिशा सॅलियन (Disha Salian) प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. मालवणी पोलीस ठाण्यात (Malvani Police Station) नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, याकरिता राणे पिता पुत्रांकडून याचिका दाखल करण्यात आली होती. दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांच्या विनंतीवरून, उच्च न्यायालयाने (High Court) सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली आहे. या याचिकेवर 29 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहेत.

मालवणी पोलीस ठाण्यात नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी, राणे पिता पुत्र यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी राजकीय दबावातून गुन्हा नोंदवल्याचा दावा राणे पितापुत्रांने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. राणे पितापुत्रांना याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 19 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी दिशा सालियन वर लैंगिक अत्याचार करुन, तीची हत्या करण्यात आली व ती गरोदर होती असा दावा केला होता. याविरोधात दिशा सालियनची सातत्याने होणारी बदनामी थांबवावी, अशी विनंती सालियान कुटुंबियांनी वारंवार केली होती. त्यानंतरही राणे कुटुंबीयांकडून बदनामी थांबवण्यात न आल्याने, अखेर सालियान यांच्या कुटुंबीयांनी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दिशा सालियनची हत्या झाल्याची सांगत, तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे आपल्या मुलीची बदनामी थांबवावी म्हणून सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता. पोलिसांनी हा अहवाल दिला आहे. त्यात दिशाच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसून मृत्यूवेळी ती गरोदर नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता सालियन कुटुंबीयांनी राणे पितापुत्रांविरोधात खोटे आरोप केल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणी राणे पितापुत्रांविरोधा गुन्हा दाखल करून घेतला होता.

राणेंचं नेमकं ट्वीट काय? : याप्रकरणी नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच, सुशांतसिंग व दिशा सालियनची सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली. सुशांतसिंग व दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे, हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल. एवढेच नाही तर, मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले बॉस आणि आपण कुठे धावणार? असं ट्वीट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होते.

काय आहे प्रकरण? : सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी, दिशाने घराच्या बाल्कनीतून उडी मारत स्वतःचे आयुष्य संपवले होते. यानंतर दिशाच्या आत्महत्येची चौकशी सुरु होती. तसेच दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का? याचीही चौकशी केली जात होती. त्याशिवाय दिशावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली, असा संशयही काही जणांनी व्यक्त केला होता. त्यानतंर याप्रकरणाची मालवणी पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाचा तपास बंद करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा मुंबईतील मालाड परिसरातील, मालवणी पोलिसांनी तपास पूर्ण केला होता. नुकतंच पोलिसांकडून याबाबतचा रिपोर्ट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही. तसेच तिची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना आढळलेले नाही, असे नमूद करण्यात आले आहे होते.

हेही वाचा : Gujarat hooch tragedy : गुजरातमध्ये विषारी दारुमुळे 28 जणांचा मृत्यू, 50 जण रुग्णालयात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.