मुंबई - कथित 100 कोटी वसुलीप्रकरणी ईडीने(ED) अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख ( Anil Deshmukh son Hrishikesh Deshmukh) यांना नोटीस बजावली होती. मात्र, ऋषिकेश देशमुख ईडी कार्यालयात न जाता, त्यांनी विशेष न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना न्यायालयाने अद्याप दिलासा दिलेला नसून, पुढील सुनावणी 20 नोव्हेंबरला होणार आहे.
हेही वाचा - ईडीकडून अनिल देशमुख यांचे मेडिकल चेकअप
अटकपूर्व जामिनासाठी केला होता अर्ज -
कथित 100 कोटी घोटाळ्याप्रकरणी अनिल देशमुख यांची ईडीने 13 तास चौकशीनंतर मध्यरात्री अटक केली होती. त्याचप्रमाणे अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनी विशेष न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज (12 नोव्हेंबर) सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने ऋषिकेश देशमुख यांना दिलासा दिला नाही. आता या याचिकेवर पुढील सुनावणी 20 नोव्हेंबरला होणार आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयात देशमुख यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांच्यावरही अटकेची टांगती तलवार असल्याचे म्हटले जात होते.
हेही वाचा - Anil Deshmukh ED Custody: अनिल देशमुखांना तीन दिवसांची ईडी कोठडी, विशेष न्यायालयाचा निर्णय