मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यात राज्यातील सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या यासाठी निवडणूक आयोगाला विनंती करण्यात येणार आहे. यासाठी सर्वमताने निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागाला निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पुणे आणि कोकण विभागासाठी प्रत्येकी १५ कोटींची तर इतर विभागांना तात्पुरत्या स्वरूपात ५ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
मंत्री राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे ;
- राज्यातील सर्व शाळा बंद
- परीक्षा पुढे ढकलण्याच्या विद्यापीठांना सूचना, दहावीच्या परीक्षा नियोजित वेळत होणार
- राज्यातील आगामी निवडणुका पुढे ढकलण्यासाठी निवडणूक आयोगाला करणार विनंती
- राज्यात कोरोना बाधित रुग्णाची एकूण संख्या 38
- दुबई, सौदी अरेबिया, युएसए या देशातून येणाऱ्या नागरिकांसाठी ए, बी आणि सी कॅटॅगिरी
घरात विलगीकरण करून ठेवलेल्यांच्या हातावर शिक्का मारणार...
राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती देताना, कोरोनाची लागण झाल्याने घरात विलगीकरण करून ठेवलेल्यांच्या हातावर शिक्का मारणार असल्याचे सांगितले. तो रुग्ण कळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
रेल्वे स्वच्छ ठेवण्यासाठी सूचना...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक प्रवेश होणाऱ्या रेल्वे स्वच्छ करण्यसाठी तसेच तिथे सॅनिटाझर ठेवा, गर्दी कमी करा अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी रेल्वेच्या बाहेरील भागावर रंगवण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंद....
दरम्यान, मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला असून मंत्रालयात कोणीही येऊ नये, असे आवाहन राजेश टोपेंनी केले. राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबत आढावा घेण्यात आला असून त्यांना जास्त लोकांना बोलावू नका. ईमेलचा वापर करा असे सांगण्यात आले आहे.
जिथे अनावश्यक गर्दी तिथेच कलम 144...
जिथे अनावश्यक फक्त मनोरंजनासाठी गर्दी केली जाते. त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
-
महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 39 झाली आहे. #CoronaVirusUpdates pic.twitter.com/lnsyWBrlgA
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 39 झाली आहे. #CoronaVirusUpdates pic.twitter.com/lnsyWBrlgA
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 16, 2020महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 39 झाली आहे. #CoronaVirusUpdates pic.twitter.com/lnsyWBrlgA
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 16, 2020
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 38 वरुन 39 वर...
राजेश टोपे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 38 असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी ट्विटद्वारे आणखी एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. त्यामुळे सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 39 झाली आहे.