मुंबई - ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे अजून पंधरा ते वीस दिवस शाळा बंद ठेवण्याबाबत ( Rajesh Tope on School Opening ) कॅबिनेट मंत्र्याच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister press on cabinet meeting ) यांनी सांगितले आहे. टोपे यांनी स्वतःचा डॉक्टर स्वतः होणाऱ्या नागरिकांवर खरमरीत टीका केली आहे. आरटीपीसीआरची क्षमता दोन लाख आहे. त्याकरू शकतो तसेच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना रॅपिड कोरोना टेस्टिंग करण्याचेही आदेश देण्यात आले असल्याची माहिती टोपे यांनी ( Health Minister on Covid Testing ) दिली. दरम्यान महाराष्ट्रात कोवॅक्सिनचा तुटवडा आहे. याबाबत आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्र्यां समवेत व्हीसीमध्ये, आम्ही लसीकरण वाढविण्यासाठी कोविशील्डच्या 50 लाख डोस आणि कोव्हॅक्सिनच्या 40 लाख डोसची मागणी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट झाली होती. आज सुमारे 46 हजार नव्या बाधितांची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची उपलब्धता वाढली असून सध्या 400 मेट्रिक टन लागत आहे. 700 मेट्रीक टनपर्यंत ही मागणी गेल्यास राज्यात लॉकडाऊन ऑटोमोडवर लागू ( health minister on Lockdown ) करावा लागेल, असे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले. मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर ते मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
-
There is a shortage of Covaxin in Maharashtra. We're getting calls from district authorities in this regard. In the VC with Union health minister, we demanded 50 lakh doses of Covishield & 40 lakh doses of Covaxin to ramp up vaccination: State Health Minister Rajesh Tope (12.01) pic.twitter.com/gsyvuK2qPG
— ANI (@ANI) January 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">There is a shortage of Covaxin in Maharashtra. We're getting calls from district authorities in this regard. In the VC with Union health minister, we demanded 50 lakh doses of Covishield & 40 lakh doses of Covaxin to ramp up vaccination: State Health Minister Rajesh Tope (12.01) pic.twitter.com/gsyvuK2qPG
— ANI (@ANI) January 13, 2022There is a shortage of Covaxin in Maharashtra. We're getting calls from district authorities in this regard. In the VC with Union health minister, we demanded 50 lakh doses of Covishield & 40 lakh doses of Covaxin to ramp up vaccination: State Health Minister Rajesh Tope (12.01) pic.twitter.com/gsyvuK2qPG
— ANI (@ANI) January 13, 2022
सेल्फ टेस्टींगवाल्यांना आरोग्यमंत्र्याचे आवाहन
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने डोकेवर काढले आहे. मागील आठवड्यात 46 हजार रुग्ण सापडले होते. तर गेल्या दोन दिवसांत मोठी घट पाहायला मिळाली. मात्र, आज पुन्हा एकदा राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 2 लाख 25 हजार इतकी आहे. त्यातील 86 टक्के रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. काहीजण घरीच कोविड टेस्ट करत आहेत. यावेळी चाचणी पॉझिटिव्ह आली तरी आरोग्य विभागाला सांगत नाहीत. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांनी जागृत होऊन जवळच्या आरोग्य केंद्रावर माहिती द्यायला हवी. अशांची माहिती घेण्याच्या सूचना आम्ही ही प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच सेल्फ टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना त्रास होत नसेल तर होम क्वारंटाईन करावे आणि आरोग्य विभागाकडून दिवसातून संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन टोपे यांनी केले आहे.
लसीकरणासाठी आवाहन
राज्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी ऑक्सिजनची एकूण मागणी 400 मेट्रिक टन इतकी आहे. त्यात कोविड आणि नॉन कोविड अशी विभागणी केली आहे. परंतु, कोविडसाठी आपल्याला केवळ 700 मेट्रिक ऑक्सिजनची गरज लागेल. त्यादिवशी लॉकडाऊन लावावा लागेल, असे मंत्री टोपे म्हणाले. राज्यात लागणाऱ्या ऑक्सिजनचा आढावा वाचून दाखवला. सध्या नॉन कोविडसाठी अडीचशे तर कोविडसाठी दिडशे मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असल्याचे टोपे यांनी सांगितले. सुरुवातीला कोरोना लस घेण्यासाठी रांगा लागत होत्या. सध्या हे प्रमाण कमी झाले आहे. आजपर्यंत 90 टक्के लोकांनी पहिला डोस घेतले आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण 62 टक्के आहे. तरीही आपण देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहोत. आपण मार्गदर्शक राज्य आहोत. त्यामुळे हे योग्य नाही. आपण 15 ते 19 वयोगटातील मुलांचे 35 टक्के लसीकरण केले आहे. अशीच गती राहिली तर पुढील 8 ते 10 दिवसात या वयोगटातील लसीकरण आपण पूर्ण करु, असा आशावाद मंत्री टोपे यांनी व्यक्त केला. तसेच शाळांबाबतही प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी पुढील 15 ते 20 दिवस शाळा अजून बंद राहतील. मात्र त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - COVAXIN Booster : कोव्हॅक्सिनचा बुस्टर डोस ओमायक्रॉनवर किती परिणामकारक? भारत बायोटेकने 'ही' दिली माहिती