ETV Bharat / city

राज्यात डेल्टा प्लसचा नवा रुग्ण नाही; लेवल तीनचे निर्बंध मात्र कायम - राजेश टोपे - maharashtra corona situation

डेल्टा प्लससंदर्भात तपासणी प्रत्येक तालुक्‍यात सुरू असून प्रत्येक तालुक्यातून शंभर नमुने तपासण्यात येत आहेत. मात्र पूर्वी आढळलेल्या एकवीस रुग्णांव्यतिरिक्त कोणताही नवीन रुग्ण राज्यांमध्ये आढळलेला नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Jul 14, 2021, 8:03 PM IST

Updated : Jul 15, 2021, 7:04 AM IST

मुंबई - राज्यात अद्याप डेल्टा प्लस(delta plus varient)चा कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नाही. डेल्टा प्लससंदर्भात तपासणी प्रत्येक तालुक्‍यात सुरू असून प्रत्येक तालुक्यातून शंभर नमुने तपासण्यात येत आहेत. मात्र पूर्वी आढळलेल्या एकवीस रुग्णांव्यतिरिक्त कोणताही नवीन रुग्ण राज्यांमध्ये आढळलेला नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी म्हटले आहे. दरम्यान, सध्याच्या कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा - राज्याला सध्यातरी तिसऱ्या लाटेचा धोका नाही, मात्र आम्ही तयार - राजेश टोपे

'लेवल तीनचे निर्बंध लागू राहणार'

आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सध्या राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये एकूण रुग्णसंख्येपैकी 96 टक्के रुग्णसंख्या ही दहा जिल्ह्यांमध्ये आहे. तर उर्वरित 26 जिल्ह्यांमध्ये उरलेली रुग्णसंख्या असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. मुंबई, पुणे, ठाणे, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे. मात्र संपूर्ण राज्यांमध्ये लेवल तीनचे निर्बंध लागू राहणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

'निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेणार'

आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत कोविड परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी घेतला आहे. मात्र अद्याप निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात कोणताही निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात काही संघटनांनी राज्य सरकारशी संपर्क साधला. खासकरून व्यापारी वर्गाने आपली दुकाने सुरू करण्यासाठी अधिकचा वेळ मागितला होता. तसेच लसीचे दोन डोस घेणाऱ्या व्यापाऱ्यांनीदेखील दुकानांचा वेळ वाढवून मागितला होता. मात्र या सर्वबाबतीत टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा - Delta plus variant : डेल्टा प्लसची लागण झालेले 21 पैकी 20 रुग्ण बरे, चिंतेची गरज नाही - राजेश टोपे

'राज्यात लसींचा तुटवडा'

राज्यात आता केवळ दोन ते अडीच लाख लस रोज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे राज्यामध्ये लसींचा सध्या तुटवडा आहे. राज्याची लसीकरणाची क्षमता रोज किमान दहा लाख तर कमाल 15 लाख एवढी आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकसंख्येनुसार राज्याला लस उपलब्ध झाली पाहिजे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, असे टोपे म्हणाले.

'लोकल प्रवासासंदर्भात कोणताही निर्णय नाही'

दोन डोस घेणाऱ्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी करण्यात येत होती. मात्र आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत लोकल प्रवासासंदर्भात कोणताही निर्णय घेतला गेला नसल्याचेदेखील राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे.

'थेट प्रवेश'

दोन डोस घेतलेल्या महाराष्ट्राबाहेरील व्यक्तींना राज्यात थेट प्रवेश दिला जाणार आहे. आरटीपीसीआर टेस्ट(RTPCR)ची गरज नसल्याचे टोपे म्हणाले.

Last Updated : Jul 15, 2021, 7:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.