मुंबई - राज्यातील रेमडेसिवीर खरेदीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. WHOने कोरोना उपचारासाठी रेमडेसिवीर वगळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, देशातील टास्क फोर्स आणि राज्यातील टास्क फोर्सशी याबाबत चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोनाच्या उपचारासाठी संजीवनी समजले जात होते, ते इंजेक्शन करोना उपचारासाठी आता लागणार नाही.
हेही वाचा - आरोग्य विभागातील सर्व रिक्त जागा दोन महिन्यात भरणार - आरोग्यमंत्री
'तांत्रिक बाजू असू शकतात'
डब्ल्यूएचओने घेतलेल्या निर्णयाच्या काही तांत्रिक बाजू असू शकतात. त्या सर्व तांत्रिक बाजू तपासल्यानंतर राज्याची आणि देशाची टास्क फोर्स रेमडेसिवीरसंदर्भात जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे टोपे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोनावर उपचार होत असताना रेमडेसिवीर इंजेक्शन गरजेचे असेलच, असे नाही.
हेही वाचा - 'पाच कोटी लसींसाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरला विदेशी कंपन्यांचा अद्याप प्रतिसाद नाही'
'कोरोनाची उपचारपद्धती बदलणार'
डब्ल्यूएचओने सांगितल्याप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोनावरील उपचारपद्धतीतून वगळण्यात आले. तर, येणाऱ्या काळात कोरोना होणाऱ्या उपचारपद्धतीवर देखील त्याचा फरक पडून उपचारपद्धती बदलली जाण्याची शक्यता आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे डब्ल्यूएचओने रेमडेसिवीरबाबत ज्या सूचना केल्या आहेत, त्या कशा स्वीकारायच्या याबद्दल टास्क फोर्स अभ्यास करून निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.