ETV Bharat / city

Rajesh Tope Letter To PM : लहान मुलं, वयोवृद्धांसाठी महाराष्ट्रात लसींची टंचाई.. पुरवठा करा, आरोग्यमंत्र्यांची मागणी

राज्यात लहान मुलांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी ( Children Vaccination Maharashtra ) आणि वयोवृद्धांच्या बूस्टर डोससाठी ( Vaccine Booster Dose Maharashtra ) कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसींची कमतरता भासत आहे. त्यामुळे राज्याला या दोन्ही लसींचा पुरवठा करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope Demands Provide Covid Vaccine ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi Reviews Covid Situation ) यांच्याकडे केली आहे.

राजेश टोपे
राजेश टोपे
author img

By

Published : Jan 14, 2022, 4:15 AM IST

मुंबई - देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांतील कोरोना रुग्णस्थितीचा आढावा ( PM Narendra Modi Reviews Covid Situation ) घेतला. राज्यात कोरोना बरोबरच ओमायक्रॉन ( Omicron In Maharashtra ) वाढत आहे. त्यामुळे लसीकरणावर ( Vaccine Booster Dose Maharashtra ) भर देण्याची गरज असून, महाराष्ट्राला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचा पुरवठा करावा, अशी लेखी मागणी केल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope Demands Provide Covid Vaccine ) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

पंतप्रधानांनी बोलूच दिले नाही

बैठकीत पंतप्रधानांनी अनेक मुख्यमंत्र्यांना बोलू दिले नाही. मला प्रत्यक्ष बोलून बाजू मांडायची संधी मिळाली नाही. त्यामुळे आम्ही लेखी निवेदन सादर केल्याचे टोपे यांनी सांगितले. आम्ही केंद्राकडे कोविशिल्ड ५० लाख आणि कोव्हॅक्सिन ४० लाखची मागणी केली. ट्रिटमेंट पद्धतीसाठी केंद्रानं मार्गदर्शन करावं. कोविड खर्च काही बाबतीत तफावत आहे. केंद्राने लसीकरणाबाबत जो काही राष्ट्रीय कार्यक्रम सुरु आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि वयोवृद्धांना बुस्टर डोससाठी कोव्हॅक्सिन लस कमी पडत आहे. त्यामुळे केंद्राकडे वाढीव लसीच्या पुरवठ्याची मागणी केली आहे. काही लोकांचा गैरसमजातून लसीकरणाला विरोध असतो. त्यामुळे केंद्राकडून याबाबत काही नियमावली करता येईल का? अशी विचारणा केली आहे. तसेच चाचणीकरिता होम किट्स आणि रॅपिड अँटिनेन टेस्टद्वारे जे लोक पॉझिटिव्ह येत आहेत त्याची माहिती मिळत नाही. याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. आर्थिक नुकसान न होता सर्व गोष्टी कराव्यात हे पंतप्रधानांनी सांगितलं आहे, असे टोपे म्हणाले. तसेच रॅपिड अँटिजेंन किट्स जिथे कमी दर मिळतील तिथून घ्यावे. जेम पोर्टलवर दर जास्त असेल तर घेऊ नये, असे आवाहन देखील टोपे यांनी केले.

डेल्टा व्हेरियंट आजही प्रभावी

चार हजार नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग केली. यावेळी तेराशे नमुने ओमिक्रॉनचे आढळले. तर २ हजार ७०० नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आला आहे. अडीच लाख केसेसमध्ये ७० टक्के डेल्टा आणि ३० टक्के ओमिक्रॉन आहे. डेल्टा आजही प्रभावी असल्याचे निदर्शनास आल्याचे टोपे म्हणाले. तसेच ट्रिटमेंट प्रोटोकॉलबाबत अत्यंत सुस्पष्टता असावी, अशी मागणी केल्याचे टोपे यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील वक्तव्य

मुख्यमंत्र्यांना तब्येत अडचणी असतील म्हणून ते अनुपस्थित होते. ते काळजी घेऊन काम करत आहेत. त्याबद्दल कोणी टिप्पणी करू नये, असा टोला मंत्री टोपे यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना लगावला. देशातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या बैठकीला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. मुख्यमंत्र्यांऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे बैठकीला होते.

पंतप्रधानांचे आवाहन

१०० वर्षातील सर्वात मोठ्या महामारी विरोधात भारताची लढाई आता तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहे. परिश्रम हा आपला एकमात्र मार्ग तर विजय हा एकमात्र पर्याय आहे. आपण १३० कोटी भारताचे लोक, आपल्या प्रयत्नातून कोरोनावर नक्की विजय मिळवू. ओमायक्रॉनबाबत सुरुवातीला जी संशयाची स्थिती होती ती आता कमी होत आहे. सुरुवातीला जे व्हेरियंट होते त्यापेक्षा कितीतरी पट अधिक वेगाने ओमायक्रॉन नागरिकांना संक्रमित करत आहे. आपल्याला सतर्क राहावं लागणार आहे. मात्र पॅनिक होऊन चालणार नाही. आपल्याला हे पाहावं लागणार आहे की, सणासुदीच्या काळात लोक आणि प्रशासन अलर्टनेसमध्ये कुठेही कमी पडणार नाही, अशी सूचना मोदींनी सर्व राज्यांना केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.