ETV Bharat / city

कामगारांनी स्थलांतर करु नये, राज्य शासन कामगारांच्या पाठीशी - हसन मुश्रीफ

कामगारांनी स्थलांतर करु नये, राज्य शासन कामगारांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ते कामगार विभागाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर बोलत होते.

Hasan Mushrif has testified that the state government is behind the workers and should not migrate
कामगारांनी स्थलांतर करु नये, राज्य शासन कामगारांच्या पाठीशी मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही
author img

By

Published : Apr 7, 2021, 10:02 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या काही कामगार स्थलांतर करत आहेत. कामगारांनी स्थलांतर करु नये, अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करत राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. बुधवारी मंत्री मुश्रीफ यांनी कामगार विभागाचा कार्यभार स्वीकारला. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद - सिंगल यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री मुश्रीफ यांचे यावेळी स्वागत केले.

अफवाना बळी पडू नका -

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत असली तरीही ती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाकडून संपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यात सर्व रूग्णालयांद्वारे अत्यावश्यक सेवा-सुविधा उपलबध करुन देण्यात आल्या असून कोणत्याही परिस्थितीत कोव्हीड अथवा इतर रुग्णांच्या आरोग्यासंदर्भात अडचणी येणार नाहीत. या काळात कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कारखाने, उद्योग, असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे कोणतेही उद्योगधंदे बंद होणार नाहीत, याची संपूर्ण दक्षता व काळजी राज्य शासनाकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता उद्योगधंद्यांमध्ये कार्यरत, स्वयंरोजगारीत सर्व कामगार व असंघटीत क्षेत्रातील कामगार यांनी आपापल्या क्षेत्रातील कारखाने, उद्योग यांमध्ये कोव्हीड नियमांचे पालन करून कामकाज चालू राहील याबाबत निसंदेह रहावे, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.

राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच बस, रेल्वे व खाजगी वाहनांची वाहतूक व्यवस्था कोव्हीड प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून सुरळीतपणे चालू राहणार आहे. त्यामुळे त्याबाबत कोणतीही भिती न बाळगता सर्वांच्या प्रवासाची व्यवस्था देखील होणार आहे. प्रत्येक कामगाराने स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतांना आपापले उद्योगधंदे नियमितपणे चालविण्यासाठी संपूर्ण हातभार लावावा,असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे. कामगार विभागातील अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी आज बैठक घेऊन कामकाजाची माहिती घेतली. राज्यातील मजूर व कामगारांच्या सध्याच्या अडचणी व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.