ETV Bharat / city

सीएसएमटी रेल्वे स्थानकांच्या हेरिटेज गल्लीमध्ये आता 'हर्बर गार्डन'

मध्य रेल्वेकडून नेहमीच पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येत आहे. यातील एक भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज गल्लीमध्ये रेल्वे प्रशासनाकडून 'हर्बल गार्डन' तयार करण्याच काम सुरू आहे.

'Harbor Gardens'
'हर्बर गार्डन'
author img

By

Published : Feb 20, 2021, 6:26 PM IST

Updated : Feb 20, 2021, 6:59 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेकडून नेहमीच पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येत आहे. यातील एक भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज गल्लीमध्ये रेल्वे प्रशासनाकडून 'हर्बल गार्डन' तयार करण्याच काम सुरू आहे. ज्यात 70 प्रकारची हर्बल वनस्पतीं वृक्ष असणार असल्याची माहीती मध्य रेल्वेकडून देण्यात आलेली आहे.

'Harbor Gardens' now in Heritage Street of CSMT Railway Station
सीएसएमटी रेल्वे स्थानकांच्या हेरिटेज गल्लीमध्ये आता 'हर्बर गार्डन'

70 प्रकारचे असणार वनस्पती वृक्ष-

मध्य रेल्वेकडून दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 18 बाहेर हेरिटेज गल्ली आहेत. या गल्लीत मध्य रेल्वेच्या ऐतिहासिक वारसा असलेले इंजिन, क्रेन आणि रेल्वेचे प्रिंट मशीनसह अनेक वस्तू प्रवाशांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहे. या वस्तूच्या आजूबाजूला बरीच मोकळी जागा होती. त्या जागांवर मध्य रेल्वेकडून 'हर्बल गार्डन' तयार करण्यात येत आहे. या गार्डनमध्ये बेहडा, हिरडा, शतावरी, भृंगराज, तुळस, आवळा, अश्वगंधा, वारपाठा, अमलतास, ग्वारपाठा, तेजपान आणि तुळशी सारख्या 70 वनस्पतींची लागवड करण्यात येत आहे. 21 फेब्रुवारी 2021 रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक या गार्डनची पाहणी करण्याकरिता येणार आहे. त्यामुळे यागार्डनचे काम जलद गतीने सुरू आहे.

1 लाख रुपयांचा येणार खर्च-

सध्या वनस्पती वृक्षांची वाढती मागणी आणि त्याच्या औषधी गुणांमुळे सीएसएमटीमध्येही आता हर्बल गार्डन सुरू केले जाणार आहे. हाउसकीपिंग विभागाद्वारे हे गार्डन तयार केले जाणार आहे. गार्डन तयार करण्यासाठी 1 लाख रुपये खर्च येणार आहे. गार्डन तयार केल्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक सहलीद्वारे विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. गार्डनमध्ये 70 प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत.

ऑक्सिजन पार्लर-

पर्यावरण रक्षणासाठी 'झाडे वाढवा, पर्यावरण वाचावा' ही मोहीम देशभरात सुरु आहे. मध्य रेल्वेकडून सुद्धा पर्यावरण रक्षणासाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबविल्या आहेत. यापूर्वी मध्य रेल्वे हवा शुद्धीसाठी रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर (रोप वाटिका) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात मध्य रेल्वेच्या नाशिक रोड स्थानकांत सुरु केली होती. या रोप वाटिकेत नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन,(नासा) कडून मान्यता प्राप्त १८ प्रकारचे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे रोपटे लावण्यात आले आहेत. आता सीएसएमटी रेल्वे स्थानकात सुद्धा औषध वनस्पती चे 70 प्रकारचे वृक्ष लावण्यात येत आहे.

हेही वाचा- सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त अजून लांबणीवर

Last Updated : Feb 20, 2021, 6:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.