मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड ( Teesta Setalvad ) ह्या मानवाधिकार कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार आहेत. आज त्यांना गुजरात एटीएसने ताब्यात घेतले आहे.
-
Gujarat ATS team reaches Teesta Setalvad's residence in Mumbai related to a case on her NGO pic.twitter.com/N2hkuqPG00
— ANI (@ANI) June 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Gujarat ATS team reaches Teesta Setalvad's residence in Mumbai related to a case on her NGO pic.twitter.com/N2hkuqPG00
— ANI (@ANI) June 25, 2022Gujarat ATS team reaches Teesta Setalvad's residence in Mumbai related to a case on her NGO pic.twitter.com/N2hkuqPG00
— ANI (@ANI) June 25, 2022
तिस्ता सटेलवाड कोण आहेत : तिस्ता सटेलवाड ह्या मानवाधिकार कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार आहेत. ते सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस किंवा सीजेपी नावाच्या संघटनेच्या सचिव आहेत. गुजरातमधील जातीय दंगलीतील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी एका एनजीओची 2002 मध्ये स्थापन करण्यात केली होती. त्या 2002 च्या गुजरात दंगलीतील कथित सहभागाबद्दल नरेंद्र मोदी आणि इतर 62 सरकारी अधिकाऱ्यांवर फौजदारी खटला चालवण्याची मागणी करणाऱ्या सहकारी याचिकाकर्त्या आहेत. त्यानंतर त्या 62 आरोपींपैकी चार जणांची नावे आरोपपत्रात दाखल करण्यात आली असून, या सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
-
Gujarat ATS detained and took activist Teesta Setalvad to Santacruz police station in Mumbai pic.twitter.com/X72wZ1pyee
— ANI (@ANI) June 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Gujarat ATS detained and took activist Teesta Setalvad to Santacruz police station in Mumbai pic.twitter.com/X72wZ1pyee
— ANI (@ANI) June 25, 2022Gujarat ATS detained and took activist Teesta Setalvad to Santacruz police station in Mumbai pic.twitter.com/X72wZ1pyee
— ANI (@ANI) June 25, 2022
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केला उल्लेख : आज सकाळी ANI ला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अमित शहांनी तिस्ता सटेलवाड यांचा उल्लेख केला होता. गुजरात दंग्याबाबत मोदींची छबी बिघडवण्याचे काम ह्या लोकांनी केले असल्याचा उल्लेख त्यांनी केला. गुजरात दंग्याबाबत पीएम नरेंद्र मोदींना सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिली. सुप्रीम कोर्टाने निकाल देताना हेही नमूद केले की, "झाकिया जाफरी दुसऱ्या कोणाच्या तरी सांगण्यावरून काम करत असे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. एनजीओने अनेक पीडितांच्या प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षरी केली आणि त्यांना माहितीही नाही. तिस्ता सेटलवाड यांची एनजीओ हे सर्व करीत होती हे सर्वांनाच माहीत आहे. त्यावेळच्या UPA सरकारने NGO ला खूप मदत केली आहे. गुजरातमध्ये आमचे सरकार होते पण यूपीए सरकारने एनजीओला मदत केली आहे. मोदीजींची प्रतिमा मलिन करण्यासाठीच हे केले गेले हे सर्वांना माहीत आहे."
गुजरात एटीएस टीम घरी दाखल : सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, गुजरात एटीएस संताक्रुझ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरी पोहोचले. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा : Live अमित शाह लाईव्ह