ETV Bharat / city

कोरोना उपाययोजनांसंदर्भात आदित्य ठाकरेंनी घेतली आढावा बैठक

मुंबईतील पावसाळापूर्व कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने चालू महिना महत्वाचा आहे. या अनुषंगाने संबंधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कामगारांचे होणारे स्थलांतर याचीही माहिती घेऊन त्याअनुषंगाने पावसाळापूर्व कामांचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या.

Aditya thackeray
Aditya thackeray
author img

By

Published : May 4, 2021, 8:08 PM IST

मुंबई - मुंबईत करण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक विविध उपाययोजनांची अंमलबजावणी, लसीकरण, त्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी सोडविणे आदींसंदर्भात तसेच या कामांमध्ये मुंबई महापालिका, पोलीस दल यांच्यामध्ये समन्वय वाढविण्याच्या अनुषंगाने आज (मंगळवार) मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने आढावा बैठक घेतली. मुंबईतील पावसाळापूर्व कामांच्या प्रगतीचीही पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी माहिती घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी, मुंबईतील महापालिका झोन्सचे उपायुक्त, पोलीस उपायुक्त, वॉर्ड ऑफिसर, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्षेत्रात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘शहरातील कोविड केअर सेंटर्स, जम्बो सेंटर्स, लसीकरण केंद्रे, आयसीयू सुविधा उपलब्ध असलेले सेंटर्स यांचे मॅपिग करणे आवश्यक आहे. जेणेकरुन कोविड संदर्भातील कोणती सुविधा कुठे आणि किती अंतरावर उपलब्ध आहे याची माहिती मिळू शकेल. खासगी, स्वयंसेवी संस्थांनी सुरु केलेल्या कोविड केअर सेंटर्सची माहितीही या मॅपिंगमध्ये घेण्यात यावी. शिवाय खासगी केंद्रांकडे असलेली औषधांची उपलब्धता इत्यादी बाबींची माहिती घेऊन प्रशासनाने त्यांना आवश्यक सहकार्य करावे,’ अशा सूचना त्यांनी दिल्या.

मुंबईमध्ये जंबो कोविड केअर सेंटरमध्ये लवकरच सुमारे ७ हजार ऑक्सिजन बेड्स तसेच सुमारे २ हजार आयसीयू/एचडीयू बेड्सची उपलब्धता करण्यात येत आहे. शिवाय जिथे शक्य आहे तिथे पेडियाट्रिक केअर सेंटरही निर्माण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे. शहरात कोविड रुग्णांना उपचार साधनांची कोणत्याही प्रकारे कमतरता भासू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रसार थोपविण्याच्या दृष्टीने हा महिना महत्त्वाचा असून सर्वांनी समन्वयाने कामकाज करावे. कोरोना प्रतिबंधासाठी पोलीस यंत्रणेमार्फतही चांगल्या प्रकारे काम करण्यात येत आहे. पोलीस दलातील उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मुंबईतील पावसाळापूर्व कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने चालू महिना महत्वाचा आहे. या अनुषंगाने संबंधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कामगारांचे होणारे स्थलांतर याचीही माहिती घेऊन त्याअनुषंगाने पावसाळापूर्व कामांचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.