ETV Bharat / city

GST department raid in Mumbai : झवेरी बाजारात जीएसटी विभागाचा छापा, 9 कोटी रोकडसह 19 किलो चांदीच्या विटा जप्त - जीएसटी विभाग छापा झवेरी बाजार मुंबई

मुंबईतील झवेरी बाजार परिसरात जीएसटी विभागाने ( GST department raid in Zaveri Bazaar Mumbai ) टाकलेल्या छाप्यात 9 कोटी 78 लाख रुपयांची रोकड आणि 19 लाख रुपयांच्या चांदीच्या विटा हस्तगत करण्यात आल्या.

GST
जीएसटी
author img

By

Published : Apr 23, 2022, 10:12 AM IST

मुंबई - मुंबईतील झवेरी बाजार परिसरात जीएसटी विभागाने ( GST department raid in Zaveri Bazaar Mumbai ) टाकलेल्या छाप्यात 9 कोटी 78 लाख रुपयांची रोकड आणि 19 लाख रुपयांच्या चांदीच्या विटा हस्तगत करण्यात आल्या. मेसर्स चामुंडा बेलीयन या दुकानावर छापा ( Zaveri Bazaar raid news ) टाकून ही मालमत्ता जप्त करण्यात आली. शुक्रवारी उशिरा ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा - Shivsainik Attack Mohit Kamboj Car : भाजप नेते मोहित कंबोज यांच्या वाहनावर शिवसैनिकांचा हल्ला

झवेरी बाजार परिसरात मेसेज चामुंदा कंपनी आहे. कंपनीची 2019 - 20 मधील उलाढाल 22.3 कोटी, 2020 - 21 मध्ये 652 कोटी आणि 2021 - 22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत वाढली. यामुळे जीएसटी विभागाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर विभागाने कंपनीवर छापे टाकले. दरम्यान 34 चौरस मीटरच्या जागेत जीएसटी कर चुकवून लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाख रुपयांची रोकड आणि 13 लाख रुपये किमतीच्या 19 लाखांच्या चांदीच्या विटा विभागाने ताब्यात घेतल्या. राज्य जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त राहुल द्विवेदी, विनोद देसाई यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा - Today's Gold and Silver Rates : जाणून घ्या, राज्यातील आजचे सोने आणि चांदीचे दर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.