ETV Bharat / city

Shhastra App For TB : क्षयरोग निर्मूलनासाठी 'शस्त्र अ‍ॅप'; प्राथमिक चाचणी घरबसल्या करता येणार - क्षयरोग निर्मूलनासाठी शस्त्र अॅप

केंद्र सरकारद्वारे 'शस्त्र' हे भ्रमणध्वनी आधारित वैशिष्ट्यपूर्ण 'अँड्रॉइड ॲप' केंद्र सरकारच्या संबंधित विभागाद्वारे तयार करण्यात आले ( Shhastra App For TB ) आहे.

TB
TB
author img

By

Published : May 27, 2022, 9:17 PM IST

मुंबई - क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्षयरोगाची बाधा होण्याची संभाव्यता असते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारद्वारे 'शस्त्र' हे भ्रमणध्वनी आधारित वैशिष्ट्यपूर्ण 'अँड्रॉइड ॲप' केंद्र सरकारच्या संबंधित विभागाद्वारे तयार करण्यात आले ( Shhastra App For TB ) आहे. या अत्याधुनिक अँड्रॉइड ॲपमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रुग्णालयात न जाता देखील क्षयरोग विषय प्राथमिक चाचणी घरबसल्या करता येणार आहे, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आवाजाचे व खोकण्याचे विश्लेषण - क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्षयरोगाची बाधा होण्याची संभाव्यता असते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकार द्वारे 'शस्त्र' हे भ्रमणध्वनी आधारित वैशिष्ट्यपूर्ण 'अँड्रॉइड ॲप' केंद्र सरकारच्या संबंधित विभागाद्वारे तयार करण्यात आले आहे. या 'अँड्रॉइड ॲप'चे महत्त्वाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या ॲपद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांचा आवाज व खोकण्याचे 'रेकॉर्डिंग' केले जाते. 'रेकॉर्ड' करण्यात आलेल्या या आवाजाचे व खोकण्याचे विश्लेषण हे 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' आधारित अत्याधुनिक प्रणालींच्या आधारे करण्यात येते. ज्याद्वारे क्षयरोग बाधा झाल्याचे प्राथमिक स्तरावरील निदान‌ होते. ह्या विश्लेषणाच्या आधारे ज्यांना क्षयरोग बाधा झाल्याचे प्राथमिक निदान झाले आहे. त्या व्यक्तींची वैद्यकीय चाचणी करुन बाधा झाल्याबाबतचे अंतिम निदान केले जाते, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंगला गोमारे यांनी दिली आहे.

प्राथमिक चाचणी घरबसल्या करता येणार - याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर गोमारे यांनी सांगितले की, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ५६४ कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून, यापैकी सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांनी या अँड्रॉइड ॲप आधारित प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे. सध्या या प्रक्रियेत केवळ क्षयरोग विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असून पुढील टप्प्यात आरोग्य खात्यातील इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश या आधारित चाचणी मध्ये करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले आहे. या अत्याधुनिक अँड्रॉइड ॲपमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रुग्णालयात न जाता देखील क्षयरोग विषय प्राथमिक चाचणी घरबसल्या करता येणार आहे. या चाचणीमुळे लवकर निदान झाल्याने लवकर उपचार करणे शक्य होऊन क्षयरोगाची बाधा नष्ट करणे शक्य होणार आहे , असेही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा - Aurangabad University Ink Thrown : औरंगाबादमध्ये राडा! उस्मानाबाद स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करणाऱ्यांना काळे फासले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.