ETV Bharat / city

शिवजयंती 2021 : छत्रपती शिवरायांना मुजरा करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी शिवाजी पार्कवर

author img

By

Published : Feb 19, 2021, 9:36 AM IST

Updated : Feb 19, 2021, 1:00 PM IST

छत्रपती शिवाजीमहाराज यांची आज ३९१ जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी कली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील शिवाजी पार्क येथे येऊन शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करतील

छत्रपती शिवरायांना मुजरा करण्यासाठी राज्यपाल

मुंबई - आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त शिवाजी पार्क, दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करत महाराजांना अभिवादन केले. यावेळी खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न देशात पूर्ण झाले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.

छत्रपती शिवरायांना मुजरा करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी शिवाजी पार्कवर

शिवस्मारकाचे काम लवकरच पूर्ण करू- अशोक चव्हाण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न प्रलंबित आहे, तो प्रश्न सोडवून स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी सरकार जनतेसाठी कार्यरत राहील ही ग्वाही देण्याकरिता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी आलो आहे. कोरोनाची परिस्थिती पाहून जयंती उत्सवावर नियम लावले आहेत, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

राज्यपाल कोश्यारी शिवाजी पार्कवर

शिवस्मारकाविषयी थोडक्यात

शिवस्मारकाची जागा राजभवनापासून 1.2 किमी, गिरगाव चौपाटीपासून 3.6 किमी आणि नरीमन पॉइंटपासून 2.6 किमी अंतरावर आहे. 6.8 हेक्टर बेटावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 210 मीटर उंचीचा पुतळा असणार आहे. हा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरणार आहे. तीन निविदांपैकी सर्वात कमी असलेली 'एल अँड टी' कंपनीची 3 हजार 826 कोटी रुपयांची निविदा पात्र ठरली. हा प्रकल्प 2 हजार 500 कोटी रुपयांचा असून त्यामध्ये जीएसटी धरण्यात आलेला नाही. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार बनवणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शिवजयंती कार्यक्रमासाठी सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने नियमावली काढून शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात शिवजयंतीला कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही, असे सरकारनं सांगितले आहे. तसेच शिवजयंती साजरी करण्यासाठी गर्दी करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. १०० पेक्षा जास्त नागरिकांनी शिवजयंती उत्सवात गर्दी न करण्याचाही निर्बंध घालण्यात आला आहे.

Last Updated : Feb 19, 2021, 1:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.