मुंबई - कोरोना बाधित झालेल्या राज्यपालांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी आहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता ( Koshyari is likely to be discharged today ) आहे. राज्यपालांना डिस्चार्ज मिळाल्यास राजकीय सत्तांतर नाट्याला वेग येणार आहे. सध्या राज्यात राजकीय उलथापालथ पहायला मिळत आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.. त्यांना मुंबईतील रिलायन्स रूग्णालयात ( Reliance Hospital ) दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन करून शिवसेनेचे ४० हून अधिक आमदार गळाला लावले आहेत. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे ( MLA Eknath Shinde ) यांच्या गटाला मिळाल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार ( Mahavikas Aghadi Sarkar ) टिकवण्यासाठी ठाकरे सरकारकडून हालचाली वाढल्या आहेत. तर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला आव्हान देत, भाजपला समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. आता राज्यपालांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदें भाजपला पाठिंबा देण्याचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवणार आहेत. त्यामुळे आता राज्यात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना