ETV Bharat / city

टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका, गोपीनाथ पडळकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा - gopichand padalkar

बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘वाटाघाटीʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असा निशाणा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरेंवर साधला.

गोपीचंद पडळकर,  आदित्य ठाकरे,  मोफत लसीकरण
गोपीचंद पडळकर
author img

By

Published : Apr 26, 2021, 12:12 PM IST

मुंबई- मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टिकेची झोड उठली आहे. भाजप आमदार गोपीनाथ पडळकर यांनी देखील, वाटाघाटी, टक्केवारीसाठी जनतेच्या हिताचा निर्णय मागे घेऊ नये, असे सुनावत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

जनतेच्या हिताचा निर्णय मागे घेऊ नये -

बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘वाटाघाटीʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असा निशाणा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरेंवर साधला. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मोफत लसीकरण करण्याचं ट्विट केले. ते ऐकून खूप आनंद झाला. पण काही वेळातच त्यांनी ट्विट डिलीट केलं. महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा निर्णय त्यांनी मागे घेऊ नये, असेही पडळकर म्हणाले.

गोपीचंद पडळकर,  आदित्य ठाकरे,  मोफत लसीकरण
गोपीचंद पडळकर यांचे ट्विट

काय होती महाविकास आघाडीची घोषणा -

राज्यातील जनतेचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. गेल्या कॅबिनेटमध्ये मोफत लसीकरणासंदर्भात चर्चा झाली. यावेळी एकमत झाले असून राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी) जाहीर केले आहे. लवकरच मोफत लसीकरणासाठी टेंडर काढले जातील, असे मलिक यांनी सांगितले. तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करुन मोफत लस देणार असल्याचे म्हटले. मात्र, काहीच वेळात आदित्य ठाकरे यांनी ट्विट डिलीट करुन सुधारित ट्विट केले. मोफत लसीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार उच्चाधिकार समितीला आहेत. ही समिती यासंदर्भात अधिकृत निर्णय जाहीर करेल, असे नमूद केले. यावरुन महाविकास आघाडीवर टिकेची झोड उठली आहे. विरोधकांकडूनही आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले जात आहे.

हेही वाचा - मोफत लसीबाबतचे धोरण उच्चाधिकार समिती ठरवणार, आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे संभ्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.