ETV Bharat / city

ST Workers Strike : पडळकर, किरीट सोमैयांना पोलिसांनी घेतले ताब्यात; मंत्रालय परिसरात पोलीस बंदोबस्त - kirit somaiya arrested

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भाजप नेते गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा दिला होता. त्यापार्श्वभूमीवर पडळकर आणि सोमैया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

mumbai
पडळकर आणि सोमैयांना पोलिसांनी घेतले ताब्यात
author img

By

Published : Nov 10, 2021, 4:06 PM IST

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भाजप नेते गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी त्यापूर्वीच आमदार निवास येथून गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) आणि किरीट सोमैया(Kirit Somaiya) यांना ताब्यात घेतले आहे. सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Workers Strike) सुरू आहे.

पोलीस बंदोबस्त तैनात -

गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचारी आंदोलनाचा प्रश्न चिघळला आहे. राजकीय नेत्यांनी आंदोलनाचे भांडवल केल्याने न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना फटकारले. तर औद्योगिक न्यायालयाने अवमान याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. सरकारने त्यानुसार कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, आंदोलक कर्मचारी मंत्रालय परिसरात पोहचू नये, यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा - ST Workers Strike : परिवहन मंत्र्यांविरोधात मुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; आमदार रवी राणांची मागणी

सकाळपासूनच चोख सुरक्षा यंत्रणा तैनात ठेवली होती. मंत्रालयात ये- जा करणाऱ्यांचीही कसून तपासणी करण्यात येत होती. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून गोपीचंद पडळकर मंत्रालयाजवळील आमदार निवास येथे ठाण मांडून बसले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास किरीट सोमैया मंत्रालय परिसरात दाखल झाले. त्यानंतर दोघेही मंत्रालयाकडे निघाले. मात्र, पोलिसांनी पडळकर आणि सोमैया यांच्यासह काही कर्मचाऱ्यांना रोखून धरत ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ येथील वातावरण ढवळून निघाले.

सरकार जबाबदार - पडळकर

पोलीस बळाचा वापर करून मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या कर्मचाऱ्यांना रोखले जात आहे. शांततेत, लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात उद्रेक घडवायचा आहे. पोलिसांच्या लाठ्या -काठ्यांचा वापर हतबल कर्मचाऱ्यांवर करण्याची मोकळीक मिळेल. मात्र, परिवहन मंत्र्यांच्या निजामशाहीमुळे जर कुठल्या कर्मचाऱ्याने हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याची सर्वस्वी जबाबदारी ठाकरे सरकारची असेल, असा इशारा पडळकर यांनी दिला.

हेही वाचा - अवमान याचिकेवर शुक्रवारपर्यंत एसटी कामगार संघटनेने उत्तर सादर करावे- मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.