ETV Bharat / city

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मध्य रेल्वेच्या मालगाड्या सुरू - COVID

पुणे विभागातील धान्य, नागपूर विभागातील वीज प्रकल्पांसाठी कोळसा, भुसावळ विभागातील कांदा, मुंबई विभागातील लोखंड व पोलाद, सोलापूर विभागातील सिमेंट त्यांच्या गंतव्यस्थानांसाठी लोड / अनलोड केले जातात.

good trains
मालगाडी रेल्वे
author img

By

Published : Mar 26, 2020, 10:02 AM IST

मुंबई - कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेने देशभरातील सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद केल्या आहेत. तथापी, दूध, भाजीपाला, अन्नधान्य इत्यादी वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मालवाहतूक गाड्या ( Goods train) चालवल्या जात आहेत. मध्य रेल्वेला सर्वसाधारणपणे देशातील आणि विशेषतः मुंबईच्या गरजा भागवण्यासाठी २४/७ काम करावे लागत आहे.

'दूध, भाजीपाला, अन्नधान्य इत्यादी वस्तूंच्या पुरवठ्यासाठी आपल्याला देशाच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने २४/७ काम करावे लागेल. या कठीण काळात आम्हाला महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागेल आणि फ्रेट गाड्यांची वेगवान वाहतूक सुनिश्चित करण्यात मदत करावी लागेल', असे आवाहन मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांनी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना केले आहे.

नियंत्रण कक्ष आणि स्टेशनवरील इतर फ्रंटलाईन कर्मचार्‍यांना चोवीस तास काम करण्यासाठी नेमण्यात आले आहे. महत्त्वाच्या वस्तूंचे लोडिंग व अनलोडींग करण्याचे काम नेहमीप्रमाणे सुरू आहे. व्यापा-यांच्या सोयीसाठी, निशुल्क वेळेत तसेच डॅमरेज आणि व्हारफेजची रिलॅक्सेशन केली गेली आहे.

गेल्या ३ दिवसात देशभरात कोळशाचे 74 रॅक, 45 रॅक कंटेनर, 6 रॅक खते, 15 रेक पेट्रोल, तेल आणि वंगण, एक रॅक कांदा विविध ठिकाणी भरण्यात आला आहे.

पुणे विभागातील धान्य, नागपूर विभागातील वीज प्रकल्पांसाठी कोळसा, भुसावळ विभागातील कांदा, मुंबई विभागातील लोखंड व पोलाद, सोलापूर विभागातील सिमेंट त्यांच्या गंतव्यस्थानांसाठी लोड / अनलोड केले जातात.

आवश्यक कीमेन (keyman)द्वारे राउंड द क्लॉक ट्रॅक पेट्रोलिंग आणि त्वरित ट्रॅककडे लक्ष देण्याचे काम सतत सुरु आहे. कीमेन विभागातील गस्त घालण्याचे काम करीत आहेत, गेटकीपर लेव्हल क्रॉसिंग गेट्स सांभाळत आहेत आणि ट्रॅकमेन त्वरित ट्रॅकच्या कामांना उपस्थित आहेत. तसेच नाईट ट्रॅकमेन विविध स्थानकांवर आपत्कालीन परिस्थितीसाठी उभे आहेत.

फ्रेट गाड्या चालविण्यासाठी कंट्रोलर, स्टेशन मॅनेजर, पॉइंट्समेन, ट्रेन क्लार्क मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या ठिकाणी चोवीस तास अथक प्रयत्न करत आहेत.

मालवाहतूक करणार्‍या गाड्या चालविल्या पाहिजेत हे सुनिश्चित करण्यासाठी ओएचई कर्मचारी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील नियंत्रण कक्षात 2 बोर्डांवर कार्यरत आहेत. मालमत्ता जपण्यासाठी ओएचई गॅग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला, ठाणे, जुईनगर, डोंबिवली, पनवेल, कल्याण, वसिंद, बदलापूर, कसारा, कर्जत, लोणावळा, इगतपुरी येथे चोवीस तास कार्यरत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.