मुंबई - पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना थेट पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत ट्विट करून पोलिसांसाठी ही खुषखबर दिली आहे. अधिवेशन संपल्यानंतर या संदर्भात मंत्रालयात एक विशेष बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती वळसे पाटलांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सध्यस्थितीत पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून जो उमेदवार भरती होतो. तो शिपाई निवृत्त होईपर्यंत जास्तीत जास्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (फौजदार) या पदापर्यंत त्याला बढती मिळते. मात्र आता पोलीस शिपाई निवृत्त होईपर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता येणार आहे.

दिलीप वळसे-पाटील यांचे ट्विट
पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
हेही वाचा - 'कयामत से कयामत तक' म्हणणाऱ्या फिल्मी हिरोचा पहिला विवाह टिकला 16, तर दुसरा 15 वर्षे