ETV Bharat / city

'अपघातात खासगी वाहनातील मृतांच्या नातेवाईकांनाही आर्थिक मदत मिळावी'

नाशिक जिल्ह्यातील सौंदाणे- देवळा रस्त्यावर कळवण-धुळे येथे झालेल्या एसटी बसच्या विचित्र अपघातात बसमधील 17 व रिक्षामधील 9 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

pravin darekar
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
author img

By

Published : Feb 28, 2020, 4:34 PM IST

मुंबई - नाशिक एसटी बस आणि रिक्षा अपघातात बसमधील मृत व्यक्तींच्या वारसांना ज्याप्रमाणे 10 लाखांची मदत मिळाली, त्याचप्रमाणे रिक्षामधील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना 10 लाखाची आर्थिक मदत मिळावी व मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका वारसाला शासकीय सेवेत नोकरी देण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सभागृहात केली. भारतीय राज्यघटनेप्रमाणे भारतातील सर्व नागरिकांना समान अधिकार आहेत, असे ते म्हणाले.

सध्यातरी अपघातातील खासगी वाहनातील मृतांच्या वारसांना 10 लाख रुपये देण्याची शासकीय धोरणात तरतूद नाही, पण यासंदर्भात विभागातील अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा व विचार विनिमय करून शासकीय धोरण आणण्याबाबत नक्की विचार करू, असे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानपरिषदेत दिले.

नाशिक जिल्ह्यातील सौंदाणे- देवळा रस्त्यावर कळवण-धुळे येथे झालेल्या एसटी बसच्या विचित्र अपघातात बसमधील 17 व रिक्षामधील 9 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याविषयी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. लक्षवेधी सूचनेवर बोलताना दरेकर यांनी सांगितले की, बस दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये व रिक्षा प्रवासातील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये मदत दिली जाते. मग बस प्रवासी आणि रिक्षा प्रवासी या दोघांना वेगवेगळे न्याय का? हा दुजाभाव का? तसेच वाहनांचे अपघात का होतात? याच्या मुळाशी जाणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे एसटीने सुरू केलेल्या शिवशाही या गाड्यांचे फक्त मॉडेल बदललेले आहे. पण या गाड्यांचे इंजिन तेच आहे. यामुळे राज्यात एसटी बसच्या अपघातात वाढ झाली आहे. तसेच एसटी स्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांच्या शौचालय, भोजन आणि राहण्याची योग्य सोय नाही. शेकडो प्रवाशांचे जीव मुठीत घेऊन सुखरूप प्रवास करणाऱ्या वाहन चालक, कंडक्टरांची दुरवस्था आहे. एसटी स्थानकावर कर्मचाऱ्यांसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्याच्या परिवहन खात्याने पुढाकार घेऊन एसटी स्थानकांचे सुशोभीकरण प्रस्तावित करावे, अशी मागणीही दरेकर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -

नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोलीचा डीव्हीसीएम विलास कोल्हाचे एके-४७ सह पोलिसांसमोर आत्मसमर्पण

राज्यातील डॉक्टरांना आता लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे नियम लागू होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.