ETV Bharat / city

सफाई कामगारांना ५० टक्के घरे मालकी हक्काने द्या, आयुक्तांकडे मागणी

author img

By

Published : Mar 14, 2022, 7:47 PM IST

मुंबई महानगरपालिकेत काम करणाऱ्या सफाई कामगारांना राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे मालकी हक्काची घरे द्यावीत, या मागणीसाठी आज आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला.

Municipal workers union house demand
सफाई कामगार घर मागणी मुंबई महापालिका

मुंबई - मुंबई महानगरपालिकेत काम करणाऱ्या सफाई कामगारांना राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे मालकी हक्काची घरे द्यावीत, या मागणीसाठी आज आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला. यावेळी आयुक्तांची भेट घेऊन पालिकेकडून बांधण्यात येणाऱ्या घरांपैकी ५० टक्के घरे मालकी हक्काने द्या, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनकडून देण्यात आली आहे.

माहिती देताना म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष वामन कविस्कर

हेही वाचा - 12th Math Statistic Paper Leak : बारावी परीक्षेचा पुन्हा पेपर फुटला; गणित आणि संख्याशास्त्र पेपर व्हाट्सअॅपवर व्हायरल

सफाई कामगारांचा आझाद मैदानात मोर्चा -

२०१७ मध्ये विलासराव देशमुख असताना सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी दरवर्षी ५०० लोकांना घरे देऊ असे सांगितले. पण केवळ ५० लोकांना घरे मिळाली. सफाई कामगारांच्या ४६ वसाहती आहेत. त्यापैकी ३६ चे पुनर्वसन केले जाणार आहे. या जागा बिल्डरांच्या खिशात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. सफाई कामगारांना सेवा निवासस्थान न देता मालकी हक्काची घरे देण्याबाबत ठोस आश्वासन द्यावे, यासाठी म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुखदेव काशिद, सरचिटणीस अ‍ॅड. महाबळ शेट्टी, कार्याध्यक्ष वामन कविस्कर आणि अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला.

५० टक्के घरे मालकी हक्काने द्या -

पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आयुक्तांना राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय दाखवण्यात आला. या निर्णयानुसार २९ हजार ६१८ कायम सफाई कामगारांना घरे देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. यावर पालिका आयुक्तांनी सध्या बांधण्यात येणारी १४ हजार घरे सफाई कामगारांना बांधून द्यायची आहेत, असे सांगितले. त्यावर युनियनने त्यामधील ५० टक्के घरे सफाई कामगारांना मालकी हक्काने द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. मात्र पालिका आयुक्तांनी यावर निर्णय घेतला नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. पण, अधिवेशन सुरू असल्याने याबाबत आपण २२ मार्चनंतर एक बैठक घेऊन चर्चा करू, असे सांगितले. आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहोत त्यामधून मार्ग निघेल, अशी माहिती वामन कविस्कर यांनी दिली.

हेही वाचा - ​​Shambhuraj Desai : 'पोलिस दलाच्या बळकटीकरणावर भर' - गृहमंत्री शंभूराजे देसाई

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.