मुंबई - मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलच्या बांद्रा युनिटने अंधेरी परिसरातून 2 ड्रग विक्रेत्यांना अटक केली आहे.
BREAKING : माजी गृहमंत्री आणि माजी मुंबई पोलीस आयुक्तांचे कुठे हनिमून सुरू आहे? - अमृता फडणवीस - महाराष्ट्र न्यूज
22:15 October 20
अँटी नार्कोटिक्स सेलच्या बांद्रा युनिटने अंधेरी परिसरातून 2 ड्रग विक्रेत्यांना केली अटक
21:41 October 20
माजी गृहमंत्री आणि माजी मुंबई पोलीस आयुक्तांचे कुठे हनिमून सुरू आहे? - अमृता फडणवीस
मुंबई - ड्रग्स ही तरुणाईमध्ये आलेली फॅशन आहे. एकाने ड्रग्स घेतले तर सर्व घेतात. यामुळे कारवाई व्हायला हवी. कोणतीही एजन्सी कारवाई करत असेल तर यांना प्रॉब्लेम असतो. सर्वांवर कारवाई होत आहे. तरुणाईला तुरुंगात टाकावे, हा माझा हेतू नाही. त्यांचे नेटवर्क काय आहे हे, कळले पाहिजे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
माजी गृहमंत्र्यांचे आणि माजी मुंबई पोलीस आयुक्तांचे कुठे हनिमून सुरू आहे, हे पहायला हवे, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या. त्याचबरोबर, सामना टीका कोणावर करेल. जर त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली तर त्यांचे वसुली सरकार चालेल कसे, असे फडणवीस म्हणाल्या.
19:10 October 20
रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई - रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती.
18:22 October 20
जामीन फेटाळल्यानंतर मुनमुन धमेचाकडून मुंबई उच्च न्यायालयाला अर्ज
मुंबई - मुनमुन धमेचा हिचा जामीन विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या निकालाविरोधात मुनमुन धमेचाकडून मुंबई उच्च न्यायालयाला अर्ज पाठवण्यात आला आहे. उद्या मुंबई उच्च न्यायालयासमोर जामिनाचा उल्लेख होण्याची शक्यता आहे.
18:18 October 20
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने आज ईडीसमोर हजर झाली
दिल्ली - अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आज ईडीसमोर हजर झाली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशी संदर्भात ती ईडीसमोर हजर झाली.
18:08 October 20
रखडलेल्या एसआरए प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
मुंबई - मुंबईतील केंद्र शासनाच्या जमिनीवरील रखडलेल्या एसआरए प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक सुरू झाली आहे.
बैठकीला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्र अनिल परब, गृहनिर्माण राज्यमंत्री बंटी तथा सतेज पाटील, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, यांच्यासह राज्यातील विविध प्राधिकरणांचे अधिकारी बैठकीला उपस्थित आहे.
17:16 October 20
जामीन फेटाळल्यानंतर आर्यन खानकडून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज
मुंबई - आर्यन खान याचा जामीन अर्ज विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या निकालाविरोधात आर्यन खानकडून मुंबई उच्च न्यायालयाला अर्ज पाठवण्यात आला आहे.
17:13 October 20
मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या खर्चाची श्वेतपत्रिका काढण्याची भाजपाची मागणी
मुंबई - मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या खर्चाची श्वेतपत्रिका काढण्याची भाजपाची मागणी.
- पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली मागणी.
- काँग्रेसकडून केलेल्या खर्चाची ऑडिट करण्याची मागणी.
तर, सत्ताधारी शिवसेनेकडून पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या खर्चाचा अहवाल सादर करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे आदेश.
17:06 October 20
मुस्लीम राष्ट्रांमध्ये हिंदूंवर सुरू असलेले अमानुष अत्याचार थांबण्याची इस्कॉनची मागणी
नागपूर - बांगलादेशसह शेजारी मुस्लीम राष्ट्रांमध्ये हिंदूंवर सुरू असलेले अमानुष अत्याचार थांबण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावे आणि हिंदूंना न्याय द्यावा, सोबतच हिंदूंना सुरक्षा आणि मदत मिळावी, या उद्देशाने आज विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली इस्कॉनकडून नागपूरचे जिल्हाधिकारी यांना निवदेन देण्यात आले. त्याआधी इस्कॉनच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात भजन गाऊन आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
16:35 October 20
आर्यन, मुनमुनचा जामीन अर्ज उच्च न्यायालयात वळवण्याची शक्यता
मुंबई - आम्ही जामीन अर्ज बॉम्बे उच्च न्यायालयात वळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. इतर दोघे देखील आपला जामीन अर्ज उच्च न्यायालयात वळवण्याची शक्यता आहे, अशी माहिती अर्बाज मर्चंट यांचे वकील अली कासिफ यांनी दिली.
16:31 October 20
न्यायालयाने आर्यन खान, मर्चंट आणि धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला
मुंबई - विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
16:04 October 20
पुण्यात इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटद्वारे परीक्षेत कॉपी करणाऱ्या उमेदवाराला अटक
पुणे - लोहमार्ग पोलिसांच्या लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटद्वारे कॉपी करणाऱ्या उमेदवाराला अटक.
14:07 October 20
मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा
मुंबई फ्लॅश -
शरद पवार वर्षा बंगल्यावर पोहचले
मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरु
कोरोना परिस्थिती, शेतकरी मदत यावर चर्चा
तसेच केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा याबाबत चर्चा होण्याची शक्यता
13:18 October 20
कळमना-पारडी नावनिर्माणाधिन उड्डाणपुलाचा भाग कोसळल्यानंतर राष्ट्रवादीचे आंदोलन
नागपूर फ्लॅश

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राडा
पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
13:10 October 20
पुण्यातील कोंढवा पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल

चित्रपट व मालिकांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत नवोदित अभिनेत्रीवर पुण्यात बलात्कार
समीर बाळू निकम असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव
आरोपी समीर निकम हा यूट्युबवर शॉर्ट फिल्म बनवतो
आरोपी एका 31 वर्षीय महिलेला चित्रपटात काम मिळवून देतो असे आमिष दाखवत सलग दोन वर्षापासून तिच्यावर करत होता बलात्कार
आरोपी समीर याने यूट्युबवर काही शॉर्ट फिल्म आणि गाणीही बनवली
समीर निकमवर पुण्यातील कोंढवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
पुढील तपास करत आहेत कोंढवा पोलीस
12:13 October 20
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत आज अर्ज छाननी प्रक्रियेला सुरुवात
Jalgaon breaking

बँकेच्या आवारातील निवडणूक शाखा विभागात राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
या निवडणुकीसाठी विविध मतदारसंघातून एकूण 279 अर्ज झाले आहेत दाखल
आज होणाऱ्या छाननी प्रक्रियेत दिग्गजांच्या अर्जांवर काय निर्णय होतो, याबाबत उत्सुकता
या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची आहेत शक्यता
11:29 October 20
भावना गवळी आज ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आज चिकनगुनियामुळे कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत - त्यांचे वकील
10:26 October 20
क्रूझ ड्रग्ज प्रकरण - आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅट्स कोर्टात सादर

पोलिसांना ड्रगशी संबंधित व्हॉट्सअॅप चॅट सापडले आहेत
जे कथितपणे आर्यन खान आणि अभिनेत्री यांच्यामधील चॅट आहे.
मुंबई एनसीबीची माहिती
10:09 October 20
मुंबईत महिलेकडून 7 किलो हेरॉईन जप्त
मुंबई गुन्हे शाखेच्या अँटी नारकोटिक सेलची मोठी कारवाई
अँटी नारकोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटने सायन परिसरातून एका महिला ड्रग्ज डीलरला अटक
महिलेकडून 7 किलो हेरॉईन जप्त
अंदाजे रक्कम 22 कोटी रुपये किमतीचे असल्याची माहिती
एनडीपीएस कायद्यान्वये औषध विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल
09:17 October 20
क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानच्या भवितव्याचा फैसला आज ठरणार आहे. त्याच्या जामीनावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्ट आज फैसला देणार आहे 20 ऑक्टोंबरपर्यंत न्यायालयाने फैसला राखून ठेवला होता.
09:17 October 20
रेल्वेतून उतरण्याची घाई महिलेच्या जीवावर बेतणार होती, पण...
औरंगाबाद - धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांनी प्राण वाचवले. धावत्या रेल्वेतून महिलेने उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, उतारताना अचानक महिलेचा गेला तोल. महिला रेल्वेखाली जाणारच होती. मात्र, तत्परतेने पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धावत जाऊन महिलेचे प्राण वाचवले. औरंगाबाद रेल्वे स्थानकावर सचखंड एक्सप्रेसमधून उतरताना हा प्रकार घडला.
07:37 October 20
Delhi-Mumbai च्या विमानात अभिनेत्रीची छेड; व्यावसायिकाला अटक
मुंबई - दिल्ली-मुंबई विमान प्रवासादरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. प्रवासादरम्यान एका अभिनेत्रीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गाझियाबादमधील एका व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. विमान प्रवासामध्ये एका अभिनेत्रीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत आला आहे.
07:23 October 20
BREAKING : आर्यन खानला 'जेल की बेल' आज कोर्टाचा फैसला
मुंबई - मुंबई विमानतळावर ' सेक्स टुरिझम रॅकेट 'चा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून दोघांना अटक करण्यात आली आहे. तर दोन पीडितांची पोलिसांनी सुटका केली. आरोपींवर भादंसं कलम 370(2)(3) आणि r/w 4,5 PITA Act अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांमुळे देहव्यापार करणे कठीण जात असल्याने तरुणींना गोव्याला नेण्यात येत होते. येथून रवाना होण्याआधीच दोन महिला दलालांना गुन्हे शाखेच्या पथकाने विमानतळाजवळ अटक केली आहे.