मुंबई - जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आलेले भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली (Gautam Adani met Uddhav Thackeray). दोघांमध्ये तब्बल तासभर खलबत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, या भेटीचे कारण गुलदस्त्यात असले तरी राजकीय वर्तुळात उलथापालथीचे नवे समीकरण जुळतेय का? याबाबत चर्चा रंगली आहे.
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना उत आला आहे. शिवसेना विरोधात भाजप आणि शिंदे गट उभा ठाकला असून दोघांमधील वाद दिवसागणिक वाढू लागला आहे. तर दुसरीकडे शिंदे सरकारचे अस्तित्व न्यायप्रविष्ट आहे. दसरा मेळाव्यावरून ही शिंदे गट आणि शिवसेनेत जुंपली आहे. असे असताना सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी अदानी यांनी भेट घेतली. या भेटीगाठीने राजकीय वातावरण ढवळून निघाले असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच राज्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथीचे नवे समीकरणं तर तयार होत नाही ना? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गौतम अदानींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, कारण गुलदस्त्यात, राजकीय चर्चेला उधाण - राजकीय चर्चेला उधाण
उद्योगपती गौतम अदानी यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली (Gautam Adani met Uddhav Thackeray). दोघांमध्ये तब्बल तासभर खलबत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, या भेटीचे कारण गुलदस्त्यात असले तरी राजकीय वर्तुळात उलथापालथीचे नवे समीकरण जुळतेय का, याबाबत चर्चा रंगली आहे.