मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईच्या (आयआयटी मुंबई) प्रवेश परिक्षेचे प्रवेशपत्र आठ जानेवारीपासून मिळणार आहे. आयआयटी बॉम्बेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही प्रवेशपत्रं उपलब्ध होतील.
असे डाऊनलोड करा प्रवेशपत्र..
गेट २०२१ या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत, ते विद्यार्थी आयआयटी बॉम्बेची अधिकृत वेबसाईट (https://gate.iitb.ac.in/) यावर जाऊन आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतात.
फेब्रुवारीमध्ये परीक्षा..
आयआयटी बॉम्बेच्या संकेतस्थळावर दिलेल्या वेळापत्रकानुसार, सहा फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ही परीक्षा असणार आहे. परीक्षेची पूर्वतयारी म्हणून विद्यार्थ्यांसाठी सराव पेपरही या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
- परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा - https://gate.iitb.ac.in/eschedule21.php
- सराव परीक्षेसाठी या लिंकवर क्लिक करा - https://gate.iitb.ac.in/mock.php
हेही वाचा : मुंबई; स्कूल बसला अचानक आग, आजूबाजूची वाहनेही पेटली