ETV Bharat / city

Chota Shakeel brother-in-law arrested : गँगस्टर छोटा शकीलचा निकटवर्तीय सलीम फ्रुटच्या एनआयएने आवळल्या मुसक्या

गँगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटला आज एनआयएने अटक केली आहे. मार्च महिन्यामध्ये ईडी आणि एनआयएने संयुक्त कारवाई करत मुंबई आणि ठाणे या परिसरामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या निकटवर्तीय तसेच दाऊद संबंधित शंका असलेल्या लोकांवर अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. सलीम फ्रुटला ताब्यात घेत चौकशीही करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्याला सोडून देण्यात आले होते.

Chota Shakeel brother-in-law arrested
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 4, 2022, 11:11 PM IST

Updated : Aug 5, 2022, 12:02 PM IST

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा राईट हँड गँगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटला ( Chota Shakeel brother-in-law arrested ) आज एनआयएने अटक केली आहे. आज सकाळी सलीम फ्रुटला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने दाऊद इब्राहिमचा तपास एनआयएकडे हस्तांतरीत केल्यानंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात छापेमारी केली होती. त्यावेळी देखील सलीम फ्रुटवाल्याची चौकशी करण्यात आली होती.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंबंधित लोकं मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी - 90 च्या दशकात फरार झालेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंबंधित ( underworld don dawood ibrahim ) लोकं मनी लाँड्रिंगमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय तपास एजेंसीला अंडरवर्ल्डचे पंजाब कनेक्शनबाबत माहिती मिळाली होती. पंजाबमध्ये अस्थिरता फैलावण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर एजेंसी आयएसआय अंडरवर्ल्डचा आधार घेत असल्याचे समोर आले होते. दरम्यान माहितीनुसार अंडरवर्ल्डसंबंधित लोकं मोठ्या प्रमाणात मुंबईहून पंजाबला पैसे पोहोचवत आहेत.

अनेक ठिकाणी छापेमारी - मार्च महिन्यामध्ये ईडी आणि एनआयएने संयुक्त कारवाई करत मुंबई आणि ठाणे या परिसरामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (underworld don dawood ibrahim) याच्या निकटवर्तीय तसेच दाऊद संबंधित शंका असलेल्या लोकांवर अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी 10 ठिकाणी धाडी टाकल्या आल्या होत्या. त्यात मुंबईत 9 तर ठाण्यात 1 ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. या सर्च ऑपरेशनमधील अनेक कागदपत्र ईडी आणि एनआयएला हाती लागले होते.

त्यावेळी देण्यात आले होते सोडून - गॅंगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटला ( Chota Shakeel brother-in-law arrested ) ताब्यात घेत चौकशीही करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्याला सोडून देण्यात आले होते. दरम्यान काही वर्षांपूर्वी सलीम फ्रुटला एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी चौकशीदरम्यान तीन वर्षांत चीन, बँकॉक, सौदी अरेबिया, श्रीलंका आणि तुर्कस्तानसह जवळपास 17 ते 18 देशांमध्ये फिरला असल्याचे समोर आले होते.

कोण आहे सलीम फ्रुट - सलीम फ्रुट हा छोटा शकीलचा मेहुणा ( Chota Shakeel brother-in-law arrested ) आहे. शकील आपल्या गुंडांच्या माध्यमातून खंडणीचे रॅकेट चालवतो. सलीम फ्रुटला 2006 मध्ये युएई मधून भारतात पाठवण्यात आले होते आणि 2010 पासून तो तुरुंगात होता. सलीम फ्रुट याचा या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ईडीकडून चौकशी करण्याकरिता ताब्यात घेण्यात आले होते. सलीम फ्रूट याचा जबाब नोंदविल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. सलीम फ्रुटशिवाय दाऊद इब्राहिमचा (underworld don dawood ibrahim) मेहुणा सौद युसूफ तुंगेकर, दाऊदचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरचा साथीदार खालिद उस्मान शेख आणि दाऊदची दिवंगत बहीण हसिना पारकरचा मुलगा आलीशान पारकर यांचेही जबाब नोंदवले जाऊ शकतात. सलीम फ्रुट त्याच्याविरोधात मुंबईतील अनेक पोलीस स्टेशन मध्ये खंडणी सहा अनेक गुन्हे दाखल आहे मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांत चीन, बँकॉक, सौदी अरेबिया, श्रीलंका आणि तुर्कस्तानसह किमान 17 ते 18 देशात सलीम फ्रुट जाऊन आला आहे.

Last Updated : Aug 5, 2022, 12:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.