ETV Bharat / city

Gang Rape In Mumbai : मुंबईत तरुणीचे तोंड दाबून चौघांनी आळीपाळीने केला सामूहिक बलात्कार - गोवंडीच्या शिवाजीनगर भागात तरुणीवर सामूहिक अत्याचार

मुंबईच्या गोवंडीच्या शिवाजीनगर भागात धक्कादायक घटना उघडकीस आली ( Young Lady Gang Raped In Mumbai ) आहे. एका तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

सामूहिक बलात्कार
सामूहिक बलात्कार
author img

By

Published : Jan 22, 2022, 4:50 PM IST

Updated : Jan 22, 2022, 8:53 PM IST

मुंबई : गोवंडीच्या शिवाजीनगर येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला ( Young Lady Gang Raped In Mumbai ) आहे. आज पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास पीडित मुलगी केटरिंगचे काम करून घरी वापस येत असताना शिवाजीनगरच्या जुन्या बस स्टॉपजवळ या चार आरोपींनी पीडित मुलीला 'तुझ्याशी काही बोलायचं आहे' असे सांगत बाजूच्या रिकाम्या झोपड्याच्या जागी नेले. त्याठिकाणी या चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

मुंबईत तरुणीचे तोंड दाबून चौघांनी आळीपाळीने केला सामूहिक बलात्कार

आरोपींच्या शोधासाठी १० टीम

पीडित मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी ४ जणांविरुद्ध भादंवि कलम 376, 376 (डी) तसेच 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिसांकडून दोन आरोपींना डोंगरी परिसरातून अटक करण्यात आली ( Two Accused Arrested In Gang Rape ) आहे. उर्वरित दोन आरोपी फरार असून, या आरोपींना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांकडून 10 टीम तयार करण्यात आल्या आहेत.

तोंड दाबून केला बलात्कार

पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांना ओळखतात. पीडित तरुणी पहाटे साडेचारच्या सुमारास केटरिंगचे काम करून घरी परतत होती. त्यावेळी शिवाजीनगर जुन्या बस डेपोजवळ हे चार आरोपी होते. त्यावेळी रोड नंबर १३ कडे जाणाऱ्या रस्त्यावर तरुणीच्या ओळखीचे हे चार तरुण तिला भेटले. त्यातील एकाने तरुणीला 'तू कुठून आलीस'? अशी विचारणा केली. तरुणीने 'मी केटरिंगचे काम करून आले' असे सांगितले. त्यावेळी त्या तरुणाने तरुणीला 'मला तुझ्याशी काही बोलायचं आहे', असे म्हणत तिला जवळच असलेल्या झोपडपट्टीतील एका रिकाम्या घराच्या पोटमाळ्यावर घेऊन गेला. त्याचवेळी त्याचे इतर साथीदारही घरात घुसले. या सर्वांनी तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने ओरडण्यास सुरुवात केली असता, एका आरोपीने तिचे तोंड दाबत जबरदस्ती करत सर्वांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

पळून जाण्याच्या आधीच दोन आरोपी अटकेत

घटनेनंतर आरोपी उत्तरप्रदेशात पळून जाण्याची शक्यता होती. पोलिसांच्या 10 पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला. तेव्हा पोलिसांना माहिती मिळाली की 2 आरोपी उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात पळून जाण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन आरोपींना डोंगरी परिसरातून ताब्यात घेतले. हे दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे, पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय घटनास्थळी दाखल झाले होते. पीडित तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Last Updated : Jan 22, 2022, 8:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.