ETV Bharat / city

'बाप्पा'वर कोरोनाचे सावट; यंदा मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार साधेपणाने - मुंबई गणेश फेस्टिव्ह

जवळपास दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहराची ओळख उत्सवांच शहर म्हणूनसुद्धा आहे. येणाऱ्या आगामी गणेशोत्सवासाठी कशा प्रकारची उपाययोजना करण्यात येणार आहे. याबद्दल प्रशासकीय स्तरावर आढावा घेतला जात आहे.

ganesh festivals
मुंबई गणेश फेस्टिव्हल संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 9, 2020, 7:22 PM IST

मुंबई - येत्या 22 ऑगस्टला मुंबईत गणेशोत्सव साजरा होणार असून, या संदर्भात प्रशासकीय स्तरावर व पोलिसांकडून मुंबईतील वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळांकडून माहिती घेतली जात आहे. कोरोना संक्रमण पाहता अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने जाहीर केले आहे. प्रशासनाचा निर्णय आम्हाला मान्य असल्याचेही समितीकडून जाहीर करण्यात आले आहे.

यंदा मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार साधेपणाने

कोविड कृती दल सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे नरेश दहिबावकर यांच्यानुसार, सध्या मुंबईत 12 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. कोरोना संक्रमण पाहता यावर्षी पोलीस व प्रशासनावर ताण पडू नये म्हणून समन्वय समितीकडून कोविड कृती दल काम करणार आहे. या कृतीदलाच्या माध्यमातून प्रत्येक म्युनसिपल वॉर्डात जनजागृती करणे, प्रशासन यंत्रणा व गणेश मंडळांमध्ये समन्वय बांधणे याबरोबरच शासनाच्या लागू होणाऱ्या नियमावलींची काटेकोरपणे पालन करणे यासारखे काम केले जाणार आहे.

कोरोना व्हायरस संक्रमण देशभरामध्ये थैमान घालत असून, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोना संक्रमण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रशासकीय स्तरावर कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, यात आणखीन वेळ लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जवळपास दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहराची ओळख उत्सवांच शहर म्हणूनसुद्धा आहे. येणाऱ्या आगामी गणेशोत्सवासाठी कशा प्रकारची उपाययोजना करण्यात येणार आहे. याबद्दल प्रशासकीय स्तरावर आढावा घेतला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.