मुंबई गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सिंधुदुर्ग वासियांसाठी मंत्री नारायण राणे Minister Narayan Rane यांच्या संकल्पनेतून दरवर्षी दादर ते सावंतवाडी एक्सप्रेस सोडण्यात येते. यंदाही चाकरमान्यांसाठी मुंबई भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या खास मोदी एक्स्प्रेसला कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ही एक्सप्रेस सावंतवाडीच्या दिशेने रवाना Modi Express ran from Dadar to Sawantwadi झाली. गणेशोत्सवासाठी सुरक्षित आणि वेळेत जाता यावे, हा यामागचा उद्देश आहे.
कोकणामध्ये मोठ्या उत्सवात गणेशोत्सव Ganeshotsav 2022 साजरा केला जातो. मुंबईमध्ये कामाला असलेले बहुतांश कोकणवासी गणेशोत्वासाठी आपल्या गावी जातात त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई भाजपाच्या वतीने खास मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मोदी एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सावंतवाडीपर्यंत जाणार आहे. दादरवरुन थेट कणकवली आणि सावंतवाडी स्थानकांवर ही एक्सप्रेस थांबणार आहे. गाडीचा सर्व खर्च मुंबई भाजपकडून केला जाणार आहे. मात्र, प्रत्येकाकडून नोंदणीशुल्क म्हणून शंभर रुपये आकारण्यात आले आहेत. मोदी एक्सप्रेसच्या सेवेबद्दल प्रवाशांनी आभार व्यक्त केले आहेत. या एक्स्प्रेसमुळे प्रवाशांच्या लुटीला चाप बसणार असून प्रत्येकी किमान हजार ते बाराशे रुपये वाचतील, अशा प्रतिक्रिया प्रवाशांकडून देण्यात आल्या.
५०० बसेसची देखील सोय गणेशोत्सवासाठी मुंबई भाजपाकडून ५०० बसेस कोकणात रवाना करण्यात आल्या आहेत. अंधेरी येथून आमदार रविंद्र चव्हाण Ravindra Chavan यांच्या उपस्थितीत काल ३० बसेस रवाना झाल्या. विशेष बाब म्हणजे या बसमधून तब्बल २० हजाराहून अधिक प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे, अशी घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. Ganeshotsav 2022 Modi Express