नवी मुंबई - मागील काही दिवसांपासून नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई ऐरोली मतदार संघाचे आमदारांनी शहरातील नागरिकांच्या सोईच्या अनुषंगाने नवी मुंबई मनपाकडे काही मागण्या केल्या होत्या. या मागण्या पूर्ण करण्यासाठी नवी मुंबई मनपा सकारात्मक पाऊले उचलत असल्याचे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना आमदार नाईक म्हणाले, 'प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन कामे करावीत'. 'सद्यस्थितीत प्रशासनाच्या माध्यमातून होत असलेल्या कामात कुठे कमतरता आहे, तसेच त्यांना माहीत नसलेल्या कामांची जाणीव करून देण्यासाठी आम्ही दर आठवड्याला पालिका मुख्यालयात येऊन आयुक्तांची भेट घेतो'. अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.
हेही वाचा - देशात कौटुंबिक हिंसाचारात 86 टक्के वाढ; पण लॉकडाऊनमुळे दाखल झालेल्या एवढ्याच तक्रारी
'इतकी वर्ष पालिका प्रशासनाला त्यांच्या कामाची जाणीव करून देण्याची गरज नव्हती, कारण पूर्वी महापौर होते, नगरसेवक होते, ते त्यांचं काम चोख करत. सद्यस्थितीत लोकप्रतिनिधी असले, तरी त्यांना कायदेशीर अधिकार नाहीत, त्यामुळे प्रशासनाला सतत जाणीव करून देण्यासाठी आम्हाला इथपर्यंत यावे लागते'. असे सांगत आपण केलेल्या मागण्यांचा नवी मुंबई मनपा योग्य रितीने पाठवपुरावा करीत असल्याचेही नाईक यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: एक शाळा अशीही जिथे मागील ४ वर्षांपासून दिले जातात ऑनलाइन शिक्षणाचे धडे..