मुंबई - पद्मभूषण पुरस्कार विजेते उद्योगपती राहुल बजाज यांचे आज पुण्यात निधन ( Rahul Bajaj Passes Away ) झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
-
#UPDATE | The funeral of Padma Bhushan-awardee industrialist Rahul Bajaj will be held with full state honours, announces Maharashtra CM Uddhav Thackeray https://t.co/ln86yFTcBh
— ANI (@ANI) February 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE | The funeral of Padma Bhushan-awardee industrialist Rahul Bajaj will be held with full state honours, announces Maharashtra CM Uddhav Thackeray https://t.co/ln86yFTcBh
— ANI (@ANI) February 12, 2022#UPDATE | The funeral of Padma Bhushan-awardee industrialist Rahul Bajaj will be held with full state honours, announces Maharashtra CM Uddhav Thackeray https://t.co/ln86yFTcBh
— ANI (@ANI) February 12, 2022
उद्या होणार अंत्यसंस्कार -
प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं शनिवारी निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. राहुल बजाज हे 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. आज त्यांचे दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी ४.३० वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमित अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
डॉ. ग्रॅंट म्हणाले यांनी सांगितले की,
यासंदर्भात माहिती देताना रुबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. ग्रॅंट म्हणाले, की गेल्या महिन्याभरापासून त्यांची प्रकृती खालावत होती. आज दुपारी ३.३० च्या सुमारास त्यांचे निधन झाले. आज दिवसभर त्यांचा मृतदेह रुबी हॉल क्लिनिकमध्ये ठेवले जाईल. उद्या सकाळी त्यांच्या कुटुंबीयांना मृतदेह दिला जाईल. त्यांचे निधन कार्डियाक आणि लंग्ज प्रॉब्लेममुळे झाले आहे. वय जास्त असल्याने त्यांना या समस्या भेडसावत होत्या.
बजाज उद्योग समूहाला मोठे करण्यात महत्त्वाचे योगदान -
प्रसिद्ध उद्योजक आणि बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन झाले आहे. पुण्यात त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 साली झाला होता. त्यांनी १९६८ मध्ये बजाज समूहाचे कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे.
'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित -
2001 मध्ये राहुल बजाज यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. तसेच त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून 'एमबीए'चेही शिक्षण पूर्ण केले होते.
प्रसिद्ध उद्योजक आणि बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन झाल्याची माहिती मिळताच सर्व क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
हेही वाचा - Rahul Bajaj Passes Away : प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचे निधन