ETV Bharat / city

मुंबई आणि उपनगरात तोतया 'क्लिनअप मार्शल्स'चा सुळसुळाट - मुंबईतील क्लिनअप मार्शल्स

रविवार सायंकाळी पूर्व द्रुतगती मार्गावर दोन जणांना दोन बोगस 'क्लिनअप मार्शल'ने लुटण्याचा, मारहाण करण्याचा आणि मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. सुदैवाने यावेळी एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी प्रशांत बढे या मार्गावरून जात असल्याने त्यांनी या बोगस 'क्लीनअप मार्शल'कडे विचारणा केली असता त्यांनी तिथून पळ काढला.

तोतया क्लिनअप मार्शल्स
तोतया क्लिनअप मार्शल्स
author img

By

Published : Aug 10, 2020, 12:16 PM IST

मुंबई - पूर्व उपनगरात तोतया 'क्लिनअप मार्शल'चा सुळसुळाट सुरू आहे. नागरिकांची थेट लुट करत दादागिरी करत असल्याचे घटना वारंवार समोर येत आहेत. मुंबईमध्ये वारंवार 'क्लिनअपचे मार्शल' रस्त्यावर नागरिकांना लुटताना दिसत आहेत. मात्र, मुंबई पोलीस आणि मुंबई मनपा या लुटींना रोखण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

रविवार सायंकाळी पूर्व द्रुतगती मार्गावर दोन जणांना अश्याच प्रकारे दोन बोगस क्लिन अप मार्शलने लुटण्याचा, मारहाण करण्याचा आणि मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. सुदैवाने यावेळी एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी प्रशांत बढे या मार्गावरून जात असल्याने, त्यांनी या बोगस 'क्लीनअप मार्शल'कडे विचारणा केली असता त्यांनी तिथून पळ काढला.

हेही वाचा - वडिलांच्या पुन्हा लग्न करण्याच्या निर्णयावर सुशांतसिंह नाराज; संजय राऊत यांचा दावा

पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपरजवळ सागर परमार आणि संजय जेठवा यांना दोन बोगस 'क्लिनअप मार्शल'ने पकडले. यानंतर या दोघांनाही मास्क घातला नाही, सिगरेट प्याले असे कारणे सांगत प्रत्येकी एक हजार असे दोन हजार रुपयांची मागणी केली. आपल्याकडे एवढे पैसे नाहीत असे सांगत त्या दोघांनी विनवणी केली. अखेर तोतयांनी त्यांच्याकडे जबरीने चारशे रुपये काढून घेण्यात आले. ही झटापट तिथून जात असलेल्या प्रशांत बढे यांनी पाहिली. त्यांनी तिथे थांबून विचारणा केली असता या बोगस 'क्लीनअप मार्शल्स'नी त्यांनाही धमकावण्याचा आणि त्यांचा मोबाईल खेचून घेण्याचा प्रयत्न केला.

प्रकरणी जेव्हा पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या बोगस 'क्लीनअप मार्शल्स'नी तिथून पळ काढला. या बाबत पालिका एन विभागाशी संपर्क साधला असता आमच्याकडे सध्या कोणतीही 'क्लीनअप मार्शल्स' यंत्रणा कार्यरतच नसल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, 'बोगस क्लीनअप मार्शल्स'ला पकडून कडक कारवाई केली जाईल असे परिमंडळ सातचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

गेल्या काही वर्षात अश्या प्रकारे 'क्लीनअप मार्शल्स'ची दादागिरी, त्यांनी केलेली मारहाण, लूट आणि बोगस 'क्लीनअप मार्शल'ची प्रकरणे वारंवार घडत असताना, यावर पालिकेने कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

हेही वाचा - कौतुकास्पद..! कोरोनामुक्त होताच तो कर्तव्यावर हजर, साडेसात तासात गाठली मुंबई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.