ETV Bharat / city

MH Assembly Winter Session 2021 : गोपीचंद पडळकरांवरील हल्ला यासह विविध मुद्द्यांनी गाजला अधिवेशनाचा चौथा दिवस - Latest News Winter Session Maharashtra

यंदाच्या पाच दिवशीय अधिवेशाचा चौथा दिवसही पहिल्या ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) तीन दिवसांप्रमाणे वादळी राहिला. आज सभागृहात नितेश राणेंनी केलेले वक्तव्य, बोगस संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र, ओबीसी आरक्षणाचा ठराव, गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar Attack ) यांच्यावरील हल्ला यासह विविध मुद्दे गाजले.

Maharashtra Assembly Winter Session 2021

author img

By

Published : Dec 27, 2021, 6:47 PM IST

मुंबई - यंदाच्या पाच दिवशीय अधिवेशाचा चौथा दिवसही पहिल्या ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) तीन दिवसांप्रमाणे वादळी राहिला. आज सभागृहात नितेश राणेंनी केलेले वक्तव्य, बोगस संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र, ओबीसी आरक्षणाचा ठराव, गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ला यासह विविध मुद्दे गाजले.

गोपीचंद पडळकरांवर हल्ला; फडणविसांचे आरोप

आज सभागृहात आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar Attack ) यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चांगला गदारोळ बघायला मिळाला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सांगली जिल्ह्यात हल्ला करण्यात आल्याचा व्हिडीओ पडळकर यांनी ट्विट केला होता. हा मुद्दा आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उपस्थित केला. यावेळी बोलताना फडणवीस यांनी पोलिसांनी कारवाईत दिरंगाई केल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे ही व्हिडीओ क्लिप पोलिसांनीच चित्रित केली असून हल्लेखोरांवर कारवाई न करता चित्रीकरणात गुंग असलेल्या पोलिसांवर कारवाई करावी, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोपही फडणवीस ( Devendra Fadnavis On Gopichand Padalkar Attack ) यांनी केला. तसेच महराष्ट्राचा बंगाल होऊ देऊ नका, असंही ते म्हणाले. दरम्यान, या संदर्भात बोलताना याबाबत योग्य ती चौकशी आणि शहानिशा करून कारवाई करण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सभागृहात दिले.

नितेश राणेंच्या निलंबनावरून सभागृहात गदारोळ

आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बद्दल पुन्हा अवमानकारक उच्चारणात केल्याबाबत निलंबित करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी सभागृहात केली. आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात अवमानकारक उच्चार सभागृहांच्या पायऱ्यांवर केला होता. याबाबत त्यांना विधानसभेत समज देण्यात आली होती. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांसमोर जाऊन असा उच्चार आपण वारंवार करू, असे म्हटले. याबाबत आमदार सुहास कांदे यांनी सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून नितेश राणे यांच्या या कृतीबद्दल त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी सभागृहात केली. ही मागणी आमदार सुनील प्रभू यांनी लावून धरत सभागृहाकडे निलंबनाची मागणी केली. त्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणे आपल्याबद्दल ही अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, असे वक्तव्य आपण तत्कालीन विधानसभाध्यक्ष बाबत करावे काय, असे उच्चार करतात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. कोणत्याही नेत्याचा अथवा सदस्याचा अवमान सभाग्रहात होऊ नये, असे सर्वानुमते ठरले. तर नितेश राणे यांनी पुन्हा एकदा अवमान केल्याबद्दल त्यांना अध्यक्षांच्या दालनात बैठक घेऊन समज देण्यात यावी, असा निर्णय सभागृहात झाला.

वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक

छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य आणि सुसज्ज स्मारक पुणे जिल्ह्यातील वडु बुद्रुक येथे उभारण्यात येणार असून त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा पराक्रमाचा आणि त्यागाचा इतिहास दर्शवणारे सुसज्ज स्मारक पुणे जिल्ह्यातील हवेली येथे वडु बुद्रुक या गावात उभारण्यात येणार आहे. दरवर्षी तुळापूर येथे महाराजांच्या समाधीस्थळावर हजारो लोक दर्शनासाठी येत असतात. त्याचप्रमाणे वडु बुद्रुक येथेही दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याचा विचार करून राज्य सरकारने या दोन्ही स्थळांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुसज्ज स्मारक उभारण्यात येणार असून पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच या कामाला सुरुवात होणार असून या बाबतची बैठक नुकतीच पार पडल्याची माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली. छत्रपती संभाजी राजेंच्या पराक्रमाला रागाला शौर्याला आणि अभ्यासू वृत्तीला साजेसे, असे हे स्मारक होणार असून त्यासाठी आराखड्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उत्तम आराखड्यास मान्यता देऊन त्यानुसार स्मारक उभारले जाणार आहे, विरोधकांनीही या घोषणेचे स्वागत करीत स्मारकाचे काम सूचित व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

ओबीसी आरक्षणासाठी एकमताने ठराव -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गातील जागा आरक्षण निश्चित होईपर्यंत भरण्यात येऊ नये. त्यासाठी ओबीसी आरक्षित जागांवरील निवडणूक तोपर्यंत घेण्यात येऊ नये, अशी शिफारस करणारा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर झाला. ही शिफारस राज्य निवडणूक आयोगाला करण्यात येणार आहे. आता निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

'महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार'

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात कालीचरण या तथाकथित बाबाने अवमानकारक शब्द उच्चारल्याप्रकरणी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला दिले. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भातील प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. संबंधित बाबांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गुन्हा दाखल करण्याचे काम सरकारचे असून सरकारने कारवाई करायला हवी सभागृहाकडे विषय मांडण्याची गरजच नव्हती असे म्हटले. यानंतर विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी सभागृहात केली. मात्र, गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे काम सरकारचे आहे. हे ध्यानात आणून देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या व्यक्‍तीवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन सभागृहाला दिले.

बोगस प्रमाणपत्र देणार्‍यांची पंधरा दिवसात चौकशी- मुश्रीफ

नागपूर जिल्ह्यामध्ये ऑनलाइन संगणक प्रशिक्षणामध्ये बोगस प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून पंधरा दिवसात चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिले. सातवी ते बारावी पास उत्तीर्ण विद्यार्थिनींसाठी ऑनलाइन संगणक प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, 2018 मध्ये कोणत्याही पद्धतीचे प्रशिक्षण न देता विद्यार्थिनींना बोगस प्रमाणपत्रे देण्यात आल्याची बाब आमदार राजेश पवार आणि सागर मेघे यांनी सभागृहात प्रश्‍नोत्तराच्या तासाला दरम्यान उपस्थित केली. प्रशिक्षणादरम्यान काढण्यात आलेले फोटो हे गृहिणींचे होते विद्यार्थिनींचे नव्हते. तसेच जी नावे या यादीत आहे की यादी बोगस आहे. सुद्धा यापैकी एकही विद्यार्थी आपल्या गावात आपल्या शेजारच्या गावात नसल्याचे राजेश पवार यांनी सभागृहात सांगितले आहे. यावर उत्तर देताना या सर्व बाबींची चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल, पंधरा दिवसात त्या बाबतीत कारवाई करू, असे आश्वासन मुश्रीफ यांनी सभागृहात दिले.

विधानसभा अध्यक्षांचा मुद्दाही आज गाजला -

आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल का, या कडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आजही अध्यक्षांची निवडणूक होऊ शकली नाही. दरम्यान, अध्यक्षांच्या निवडीसदंर्भात बनवण्यात आलेली नवी नियमावली घटनाबाह्य असल्याचे राज्यपाल यांच्याकडे सांगण्यात आले. त्यामुळे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Minister Anil Parab on ST Employees : कर्मचाऱ्यांची बडतर्फ कारवाई मागे घेणार नाही - अनिल परब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.