मुंबई - शिवाजीनगर परिसरातील बैगनवाडीमध्ये ( Shivaji Nagar ) एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह ( Suicide of four person in the family Mumbai ) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार पती, पत्नी आणि दोन मुलांचे हे मृतदेह असून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे.
मृतकाचे नाव अस्पष्ट : प्राप्त माहितीनुसार, मृतदेहाची नावे अघ्यापही अस्पष्टच आहे. या मागे नेमके काय कारण असावे? याचा शोध पोलीस घेत आहेत. शिवाय शेजारी असलेल्या कुटुंबाकडून माहिती घेण्याचे काम पोलीस करत आहे.
हेही वाचा - Double decker bus overturning in Rishikesh: ऋषिकेशमध्ये डबल डेकर बस पलटी, थरारक व्हिडिओ व्हायरल