मुंबई - ऑटोरिक्षा चालवण्याच्या नावाने ड्रग्जची तस्करी करणाऱ्या ४ रिक्षाचालकांना मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी घाटकोपर परिसरातून गोरेगाव फिल्मसिटीला ड्रग्जचा पुरवठा करत होती. हुसेन कुरेशी (३८) अब्दुल रज्जाक मोहम्मद रफिक शेख (३१) सलीम आझम शेख (२४) मोहम्मद अली निजामुद्दीन खान (२४) यांचा समावेश असून, हे सर्वजण घाटकोपर भागातील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. शिवाय गांजा जप्त करून एक ऑटो जप्त केला आहे. चार आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
गस्त सुरू असताना दिंडोशी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या गस्ती पथकाला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वामी नारायण मंदिर मालाड पूर्वेजवळ निर्जन ठिकाणी काही संशयास्पद रिक्षासह दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. आरोपी ऑटो घेऊन पळू लागला. पोलिसांनी ऑटोचा पाठलाग करून चौकशी केली. तेव्हा ऑटोरिक्षात ठेवलेला गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले आणि रिक्षा जप्त केली आहे. शिवाय या आरोपीना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा - २५ वर्षीय तरुणीशी लग्न करणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने केली आत्महत्या.. सोशल मीडियावर झाला होता व्हायरल