ETV Bharat / city

मुंबईतील 1,698 रुग्णांची कोरोनावर मात; आज आढळले कोरोनाचे 1,372 नवे रुग्ण, 73 मृत्यू

आज मुंबईत नवे 1372 रुग्ण आढळून आले असून 73 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 81634 वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 4759 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज एकाच दिवशी 1698 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 52392 वर पोहोचला आहे.

mumbai
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 3, 2020, 10:02 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूचे मुंबईत आज नवे 1372 रुग्ण आढळून आले असून 73 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 81634 वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 4759 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज एकाच दिवशी 1698 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 52392 वर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 24483 सक्रिय रुग्ण असून मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 64 टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नव्याने 1372 रुग्ण आढळून आले आहेत. तर 73 जणांचा मृत्यू झाला आहे. 73 मृत्यूपैकी 58 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 49 पुरुष आणि 24 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 4 जणांचे वय 40 वर्षाखाली होते. 40 जणांचे वय 60 वर्षावर तर 29 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज 1698 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 52392 वर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 81634 वर पोहोचला आहे. त्यापैकी 4759 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईमधून आतापर्यंत 52392 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 24483 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर 64 टक्क्यांवर

मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 64 टक्क्यांवर पोहोचला आहे. 26 जून ते 2 जुलैपर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.72 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 41 दिवस इतका आहे. मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा 757 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभागात कंटेनमेंट झोन म्हणून सिल करण्यात आले आहेत.

कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 6352 इमारतीमधील काही माळे, काही विंग तर काही इमारती पूर्ण सिल करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 9800 अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला. सध्या कोरोना केअर सेंटरमध्ये 12465 अतिजोखमीच्या संशयितांना क्वारनटाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत 115692 अतिजोखमीच्या संशयितांना क्वारनटाईन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे निदान करण्यासाठी 344968 इतक्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.