ETV Bharat / city

मनसुख हिरेन हत्या प्रकरण : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला 28 जूनपर्यंत एनआयए कोठडी

एनआयएकडून आज सकाळी 6 च्या सुमारास प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील जे. बी. नगर निवास स्थानी छापेमारी करण्यात आली. ही छापेमारी जवळपास 4 ते 5 तास चालली. यावेळी काही महत्त्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

author img

By

Published : Jun 17, 2021, 7:28 PM IST

Updated : Jun 18, 2021, 6:41 AM IST

mansukh hiren murder case
मनसुख हिरेन हत्या प्रकरण : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना 28 जूनपर्यंत एनआयए कोठडी

मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एनआयएने गुरुवारी (१७ जून) मुंबई पोलिसांतील माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह तीन जणांना अटक केली आहे. त्यानंतर आज (गुरुवार) प्रदीप शर्मा यांना एनआयएच्या विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना 28 जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एनआयएकडून आज सकाळी 6 च्या सुमारास प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील जे. बी. नगर निवास स्थानी छापेमारी करण्यात आली. ही छापेमारी जवळपास 4 ते 5 तास चालली. यावेळी काही महत्त्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

प्रदीप शर्मांच्या घरातून पिस्तूल जप्त -

'मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटामध्ये या तिघांचा सहभाग होता. हे तिघेही सचिन वाजेंसोबत मिळून हा गुन्हा केला आहे. सचिन वाजे आणि प्रदीप शर्मा या दोघांनी कट रचून मनसुखच्या हत्येनंतर पुरावे नष्ट केले आहेत.' असा युक्तीवाद एनआयएच्या वकिलांकडून करण्यात आला. तसेच आत्तापर्यंत अटक केलेले सर्व आरोपी हे या प्रकरणानंतर एकमेकांच्या संपर्कात होते. तसेच प्रदीप शर्मा हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या घरातून एक पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. या पिस्तूलच्या लायसनची मुदत संपली असल्याचेही एनआयएतर्फे सांगण्यात आले.

आरोपीच्या वकीलांकडून आरोपाचे खंडन -

दरम्यान, आरोपींच्या वकीलांकडून एनआयएने लावलेल्या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले. तसेच आरोपी तपासात सहकार्य करत असल्याचेदेखील आरोपीच्या वकिलांकडून सांगण्यात आले. एनआयएने यापूर्वी आरोपींना चौकशीसाठी बोलवले होते. त्यावेळीही आरोपी उपस्थित होते, असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला. यावेळी प्रदीप शर्मा भावूक झाल्याचे दिसून आले. तसेच 'माझा आणि सचिन वाजेचा काहीही संबंध नसून अटकेत असलेला संतोष माझा जुना खबरी आहे, बाकी अटक केलेल्या आरोपींना मी ओळखत नाही, असे प्रदीप शर्मा यांनी न्यायालयात सांगितले.

कोण आहे प्रदीप शर्मा -

प्रदीप शर्मा हे 1983 पासून मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. एन्काऊटंर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख होती. मुंबई पोलीस दलात असताना त्यांनी 113 गँगस्टरचे एन्काऊटंर केल्याची नोंद आहे. तसेच 2010 मध्ये लखन भैया बनावट एन्काऊटर प्रकरणात त्यांना अटक झाली होती. तर 2013 मध्ये प्रदीप शर्मा जेलमधून बाहेर आले होते. त्यांना प्रदीप शर्मा यांना पुन्हा मुंबई पोलीस दलात रूजू करण्यात आले. 2017 मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला शर्मांनी अटक केली होती. त्यासोबतच त्यांनी 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांचा पराभव झाला होता.

काय आहे मनसुख हिरेन प्रकरण -

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ आढळून आली होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची असल्याचे तपासांत पुढे आले होते. त्यानंतर मनसुख हिरेन त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने यापूर्वी 7 जणांना अटक केली होती. आज पुन्हा 3 जणांना अटक केली आहे. त्यामुळे याप्रकरणात अटक झालेल्यांची संख्या 10 झाली आहे.

हेही वाचा - उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगे भडकवले जातील - अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर

Last Updated : Jun 18, 2021, 6:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.