मुंबई - गृह विभागाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर कारवाई करत परमविर सिंग यांना दिले जाणारे वेतन रोखले असल्याची माहिती समोर येत आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग नेमके कुठे आहेत? -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गेल्या काही महिन्यापासून बेपत्ता आहे. परमबीर सिंग यांच्यावर खंडणी तसेच बेकायदेशीर कृत्य ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे मुंबई आणि ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. यासंबंधी चौकशीसाठी पोलीस विभागाकडून वेळोवेळी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र अद्यापही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग नेमके कुठे आहेत? याबाबत राज्य सरकारला कोणतीच माहिती नाही. मुंबईचे पोलीस आयुक्त असताना राज्याचे तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये अवैधरित्या जमा करण्याचा आरोप पत्राद्वारे परमबीर सिंग यांनी लावला होता. या आरोपानंतर परमबीर सिंग बेपत्ता असल्याची चर्चा आहे.
पोलीस महासंचालकांना गृह विभागाच्या सूचना -
मुंबईचे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंग यांची मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पदावरून उचलबांगडी झाली होती. त्यानंतर परमबीर सिंग यांची होमगार्ड विभागांमध्ये बदली करण्यात आली होती. मात्र इथे त्यांनी आपला पदभार स्वीकारला नाही. पदभार स्वीकारण्याआधीच त्यांनी आठ दिवसाची आणि त्यानंतर 15 दिवसाची रजा घेतली. मात्र त्या रजा संपल्यानंतरही परमबीर सिंग पदावर रुजू झाले नाहीत. तसेच ते अद्यापही कोठे आहेत याबाबत पोलीस विभाग तसेच राज्य सरकारला कोणतीही माहिती नाही. कोषागार विभागाने याबाबत गृह विभागाला माहिती दिली असून याबाबत पोलीस महासंचालक यांना ही माहिती देण्यात आली आहे. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत गृह विभागाने वेतन रोखण्याबाबत पत्र दिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
हेही वाचा - "मी गुपचुप तुझ्याकडून गांजा घेईल" अनन्या-आर्यनचे "ते" कथित व्हाटसअॅप चॅट आले समोर!