ETV Bharat / city

हातकणंगलेचे माजी आमदार राजीव आवळे यांचा 'राष्ट्रवादी'त जाहीर प्रवेश - ncp mumbai news today

आवळे यांच्यासोबत इचलकरंजी नगरपरिषदेचे सदस्य अब्राहम आवळे, वडगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते रामभाऊ सूर्यवंशी, कबनूरचे भाजपाचे शहराध्यक्ष सुधाकर कुलकर्णी, भाजपाचे नितिन कामत, बाबू पतोरी, दिनेश डायमा, पिंपरी-चिंचवड येथील लहुजी सेनेचे युवराज दाखले, वडगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा लता सूर्यवंशी यांनी प्रवेश केला.

NCP
NCP
author img

By

Published : Dec 16, 2020, 1:22 PM IST

मुंबई - जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आवळे यांच्यासोबत इचलकरंजी नगरपरिषदेचे सदस्य अब्राहम आवळे, वडगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते रामभाऊ सूर्यवंशी, कबनूरचे भाजपाचे शहराध्यक्ष सुधाकर कुलकर्णी, भाजपाचे नितिन कामत, बाबू पतोरी, दिनेश डायमा, पिंपरी-चिंचवड येथील लहुजी सेनेचे युवराज दाखले, वडगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा लता सूर्यवंशी यांनी प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बेलोर्ड पियर येथील मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते महेश तपासे, कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष ए. वाय पाटील, मदन कारंडे, तालुकाध्यक्ष दशरथ पिष्ठे, बी. के. चव्हाण, प्रकाश पाटील यावेळी उपस्थित होते.

'दोन्ही खासदार निवडून देणारा जिल्हा'

राजकीय जीवनात शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ३० वर्षे काम करत आहोत. यामध्ये अनेक लोकांची ओळख होत असते. त्यामध्ये जनसुराज्य पक्षाचे काम करताना राजीव आवळे यांचे काम मी पाहात आलो आहे. ते गरीब व वंचित वर्गासाठी काम करत आहेत. तसेच यावेळी महाविकास आघाडीचे सरकार असून आमची मदत करण्याची भूमिका असणार आहे, असे अजित पवार म्हणाले. आता कोल्हापूर जिल्ह्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीमध्ये अधिक सदस्य कसे येतील, असे काम करावे लागणार आहे, असे आवाहनही पवार यांनी केले. सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. दोन्ही खासदार निवडून देणारा हा जिल्हा आहे. पक्षावर आणि पवारसाहेबांवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली. देशासमोर शेतकर्‍यांचा प्रश्न आ वासून उभा आहे. केंद्राकडून प्रश्न सोडवले जात नाहीत. मात्र आम्ही सर्व घटकांना न्याय देणारे आहोत. इतर घटकांच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहोत, हेही त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम महाराष्ट्र हा बालेकिल्ला आहे, त्यात अधिक भर घालण्याचे काम करू. मातंग समाजाच्या साथीने आपण पक्ष वाढवूया, असे आवाहन पवार यांनी केले.

'दांडगा संपर्क हिताचा'

राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. राजीव आवळे यांचासारखा एक चांगला माणूस आपल्या पक्षात येत आहे, त्यांचे जयंत पाटील यांनी स्वागत केले. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जे आज पक्षात प्रवेश करत आहेत, त्यांची विविध विकासकामे करण्यासाठी मदत करू. जनसुराज्य पक्षाने तिकीट न दिल्यामुळे राजीव आवळे यांनी बंडखोरी करून अगोदरच राजीनामा दिला होता. त्यामुळे ते सध्या तरी अपक्ष आहेत. त्यांचा दांडगा संपर्क लक्षात घेता पक्षाला त्यांची चांगली मदत होणार आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली. भाजपाने धमक्या दिल्या होत्या. प्रवेश करून घेतला होता. ते सर्व आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्याची सुरुवात आज राजीव आवळे यांच्या प्रवेशाने होत आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

'राष्ट्रवादीशिवाय दुसरे काम करणार नाही'

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर राजीव आवळे यांनी भविष्यात राष्ट्रवादीशिवाय दुसरे काम करणार नाही, असे स्पष्ट करतानाच २०२१मध्ये राज्यातील मातंग समाजात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे आश्वासन दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.