ETV Bharat / city

वडेट्टीवारांविरोधातील माजी आमदार मितेश भांगडियांची याचिका फेटाळली

author img

By

Published : Jan 13, 2021, 5:43 PM IST

विविध पदावर काम करताना करत असलेली जनसेवा माझ्या विरोधकांच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी याअगोदर केला होता. विरोधक केवळ सुतळीचा साप करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

vadettivar
vadettivar

मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात माजी आमदार मितेश भांगडिया यांनी पासपोर्ट प्रकरणावरून दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

पासपोर्ट स्वतः जमा केल्याचा दावा

दरम्यान राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आल्याची माहिती व बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर मंत्री महोदयांनी स्वतः पुढे येऊन या गोष्टीत तथ्य नसल्याचे म्हटले. मी स्वतः माझा पासपोर्ट जमा केला असल्याचे त्यांनी म्हटले होते. मी गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे. विविध पदावर काम करताना करत असलेली जनसेवा माझ्या विरोधकांच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी याअगोदर केला होता. विरोधक केवळ सुतळीचा साप करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

बदनामीचा विरोधकांकडून प्रयत्न

सध्या माझ्या नावावर एकही गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल नसून माझ्या बदनामीचा विरोधक प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परवाना जप्त केल्याची बातमी समोर आल्यावर तो जप्त केला नसून त्यांनी स्वतः सक्तवसुली संचालनालय कार्यालयात 21 डिसेंबरला जमा केल्याचे स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.